शिरुर एसटी बसस्थानक आहे कि असुविधांचे आगार ?

शिरुर, ता.१० नोव्हेंबर २०१७ (सतीश केदारी) : शिरुर बसस्थानकात महत्वाच्या सुविधांची वानवा असुन प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चिञ दिसत आहे.त्यामुळे हे बसस्थानक आहे कि असुविधांचे आगार ? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

शिरुर बसस्थानक हे शिरुर,पारनेर, श्रीगोंदा या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे बसस्थानक असुन या तीन तालुक्यांसह अन्य जिल्ह्यांना व मुंबइ, पुण्याला जाण्यासाठी नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते.येथील बसस्थानकातील उपहार गृह हे साधारणत: तीनवर्षांपासुन बंद आहे.त्यामुळे येथील कर्मचा-यांसह प्रवाशांनाही जास्त पैसे मोजुन अन्य ठिकाणी चहा-नाष्ट्यासाठी जावे लागते.बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे गरजेचे असताना या ठिकाणी कुठेही शुद्ध पाण्याची व्यवस्था नसते. ज्या ठिकानी पाण्याची व्यवस्था आहे.त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंञणा नाही.त्यामुळे प्रवाशांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असुन जास्तीचे पैसे मोजुन पाणी विकत घ्यावे लागते.महिला व बालकांसाठी प्रत्येक बसस्थानकात स्तनपानासाठी हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे. परंतु येथे हिरकणी कक्ष आहे कुठं असा सवाल महिलांनी केला आहे.


 
शिरुर बसस्थानकातील महत्त्वाची समस्या म्हणजे वेळेवर गाड्या फलाटावर न लागणे. येथुन बाहेर पडणा-या बसेस या वेळेवर कधीच लागत नसल्याच्या तक्रारी अनेकांच्या असतात.या बसेस वेळेवर न लागल्याने विद्यार्थीनींसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन बस हुकल्यास जायचे कुठे असा सवाल शालेय विद्यार्थ्यांनी केला आहे.पुणे, नगर कडे जाणा-या बसेस ह्या प्रत्येक फलाटावर लावल्या जातात परंतु ग्रामीण भागात अन्यञ धावणा-या बसेस ह्या कधीच वाहनचालक व वाहक फलाटावर लावत नाहीत.यामुळे बस कोणती आहे हे पाहण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ होते.त्यातुन अनेकदा भांडणे व चेंगराचेंगरी होत असल्याचे दिसते.त्यामुळे वाहकांसह बसचालकांनाही फलाटावर बस लावण्यासाठी प्रशासनाने शिस्त लावणे गरजेचे आहे.

शिरुर बसस्थानकात बसस्थानकाशिवाय खासगी वाहने हे पार्किंग केले जातात.त्यामुळे हे बसस्थानक आहे कि खासगी वाहनतळ असाही प्रश्न अनेकांना पडतो.त्याचप्रमाणे बसस्थानकात नित्याने भटक्या जनावरांचा सुळसुळाट नेहमी पाहायला मिळतो.या भटक्या जनावरांचा ञास प्रवाशांसह बसचालकांना होतो त्यामुळे बस आगारातुन बाहेर काढताना वाहनचालकांना एकप्रकारे कसरतच करावे लागते.बसस्थानकात अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली असुन अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याचे दिसुन येतात. तसेच अवैध प्रवाशी वाहतुक करणा-यांचीही या ठिकाणी चलती असुन यांवर कारवाई कोण करणार? बसस्थानकात नागरिकांना सोयी-सुविधा कधी निर्माण करणार करणार? अवैध पार्किंगवर कठोर कारवाई प्रशासन करणार का?  असा सवाल नागरिकांनी  केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या