अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देउन बलात्कार

शिरुर,ता.१५ नोव्हेंबर २०१७ (प्रतिनीधी) : शिरुर येथे अल्पवयीन मुलीस व वडिलांना जिवे मारण्याची धमकी देउन गेल्या चार महिन्यांपासुन वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडित युवतीने शिरुर पोलीस स्टेशन अत्याचाराची तक्रार दिली आहे.

 
आकाश भालेराव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिडित मुलगी हि दहावी इयत्तेत शिकत  असुन क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडत असे.त्यावेळी आरोपी आकाश भालेराव याने पिडितेला वेळोवेळी मला तु आवडतेस असे म्हणुन वारंवार ञास देत होता.पिडित मुलीच्या मैञिणीद्वारे आरोपीने या मुलीशी मैञी जमविली.तसेच वाढदिवशी या मुलीला आमिष दाखवुन वाढदिवस दुसरीकडे साजरा  करु असे म्हणुन हॉटेल मध्ये घेउन गेला.त्या वेळी आरोपी व पिडित मुलीसोबत तिची मैञिण होती.यावेळी मैञिणीला बाहेर जाण्यास सांगुन मला खासगीत बोलायचे आहे असे सांगुन पिडितेशी आरोपीने अश्लिल चाळे केले.यानंतर मुलीने आरोपीस नकार देत मला असे आवडत नाही असे म्हणुन यापुढे माझ्याशी कोणतेही संबंध ठेउ नकोस असे सांगितले.यानंतर आरोपीने तु जर माझ्याशी संबंध ठेवले नाही तर आई वडिलांना व तिला जिवे मारण्याची धमकी दिली.सप्टेंबर २०१७ मध्ये पुन्हा आरोपीने पिडितेच्या घरात घुसुन आई वडिल घरात नसताना व पिडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने पुन्हा जिवे मारण्याची धमकी देत पिडितेच्या इच्छेविरुद्ध शारिरिक संबंध केले.त्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी आरोपीने पिडितेशी असाच प्रकार केला.

त्यानंतर वेळोवेळी आरोपीने वडिलांना व पिडितेला जिवे मारण्याची धमकी देत शारिरिक संबंध ठेवले.पिडितेने हा वारंवार घडू लागल्याने मावसभावास घडलेली हकिकत सांगितली व त्यानंतर शिरुर पोलीस स्टेशन येथे आरोपी आकाश विरुद्ध तक्रार नोंदविली. शिरुर पोलीसांनी आरोपी आकाश भालेराव विरुद्ध बलात्कार तसेच लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या