व्हिडिओ पाहिला तब्बल दोन लाखांहून अधिक जणांनी!

शिरूर, ता. 16 नोव्हेंबर 2017 (सतीश केदारी): शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने फेसबुकवर अपलोड केलेला व्हिडिओ तब्बल  दीड लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून तालुकास्तरावर एक विक्रम केला आहे.


कानगवा येथे शेतकरी संपामध्ये छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने सरकारविरोधात जोरदार भाषण केले होते. संबंधित व्हिडिओ 13 नोव्हेंबर रोजी आमच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. शिवाय, प्रत्येक मिनिटाला ही आकडेवारी बदलताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यावरूनच संकेतस्थळाची लोकप्रियता दिसून येते.

शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बातम्या www.shirurtaluka.com वर प्रसिद्ध होत असतात. या बातम्यांमुळेच संकेतस्थळाने आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बातम्यांबरोबरच Video ही अपलोड केले जातात. संबंधित बातम्या व Video नां वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाचकांच्या मनातील बातम्या असल्यामुळे त्या सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स आपले परखड मत व्यक्त करताना दिसतात. शिरूर तालुक्यातील वाचकांना परखड मत व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. संकेतस्थळसह फेसबुकवर नेटिझन्स परखड मत व्यक्त करत असल्यामुळे अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. संकेतस्थळ यापुढेही सर्वसामान्य नागरिकांच्याच बातम्यांवर भर देणार आहे.

संकेतस्थळाचे फेसबुकवर विविध पेजच्या माध्यमातून 40 हजाराहून अधिक Likes आहेत. शिवाय, शिरूर तालुक्यातील विविध 650 व्हॉट्सऍप ग्रुप जोडले गेले आहेत. यामुळे तालुक्यातील कोणतीही बातमी एका सेंकदात लाखो वाचकांपर्यंत पोचताना दिसते. संकेतस्थळाच्या आकडेवारीवरूनच सर्व पारदर्शकपणा दिसून येतो. यामध्ये कोणतीही ढोबळपणे आकडेवारी नसून, फेसबुकने दिलेली आकडेवारी असून, पुराव्यांसह वाचकांसमोर ठेवत आहोत.


बातमी पोचते एक कोटीहून अधिक वाचकांपर्यंत...
www.shirurtaluka.com ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर फेसबुकवर अपलोड केल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून तब्बल एक कोटीहून अधिक वाचकांपर्यंत पोहचत आहे. शिवाय, संकेतस्थळ व्हॉट्सऍप ग्रुप वेगळेच. ही आकडेवारी एकत्र केली तर काही लाखांहून अधिक वाचकांपर्यंत संकेतस्थळाचे वृत्त जात आहे. शिवाय, संकेतस्थळाच्या वृत्तांवर विविध ग्रुपवर चर्चा होताना दिसते. यामुळे शिरूर तालुक्यात संकेतस्थळ आघाडीवर असून, त्याची लोकप्रियता आकडेवारीवरून दिसून येते. संकेतस्थळाच्या वतीने वाचकांचे मनापासून धन्यवाद!

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या