शिंदोडीच्या सोसायटीवर 54 वर्षांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिला

शिंदोडी, ता. 20 नोव्हेंबर 2017 (तेजस फडके): येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी कल्पना शिवाजी ओव्हाळ आणि उपाध्यक्षपदी पुष्पा सुभाष ओव्हाळ यांची निवड करण्यात आली. सोसायटीच्या स्थापनेनंतर ५४ वर्षात पहिल्यांदाच एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने संचालकांच सर्व स्थरातून कौतुक होत आहे.


शिंदोडी विकासोमध्ये १३ संचालक असून पुर्वीचे अध्यक्ष शिवाजी वाळूंज आणि उपाध्यक्ष कुमार ओव्हाळ यांचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. शुक्रवारी (ता. १७) शिरुर येथे निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी कल्पना ओव्हाळ तसेच कुमार ओव्हाळ यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. कल्पना ओव्हाळ यांना ८ तर कुमार ओव्हाळ यांना ५ मते पडली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. गव्हाणे यांनी काम पाहिले.

शिंदोडीच्या इतिहासात प्रथमच विकासोच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेची निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शिरुर तालुका शेतकरी सेनेचे अध्यक्ष योगेश ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज, सोसायटीचे संचालक दुर्योधन गायकवाड, खंडू माने, शिवाजी वाळुंज, राजेंद्र वाळुंज, भाऊसो वाळुंज, अंकुश खेडकर, रवींद्र वाळुंज, नंदू वाळुंज, बाजीराव कोळपे, भगवंत वाळुंज, एकनाथ शिंदे, विठ्ठल वाळुंज, अशोक वाळुंज व ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष कल्पना ओव्हाळ www.shirurtaluka.com सोबत बोलताना म्हणाल्या, 'सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या