गुजर प्रशालेत संविधान व महात्मा फुले स्मॄतीदिन साजरा

तळेगाव ढमढेरे, ता. 29 नोव्हेंबर 2017 (एन.बी.मुल्ला): येथील स्वातंञ्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत संविधान दिन  व महात्मा फुले स्मॄतीदिन साजरा करण्यात आला.
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंञ्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत संविधान दिनानिमीत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपप्राचार्य जगदीश राऊतमारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील विद्याथ्र्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन केले. या कार्यक्रमात 26/11 च्या हल्ल्यात विरगती प्राप्त झालेल्या सर्व हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राजाराम पुराणे, मोहन ओमासे, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा फुले स्मॄतीदिनानिमीत्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेस प्राचार्य माणिक सातकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अशोक दहिफळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, मोहन ओमासे, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या