शिरुरच्या नगरसेवकांना गांभिर्य नाही काय ?

शिरुर, ता. १ डिसेंबर २०१७ (अभिजित आंबेकर/सतीश केदारी): शिरुर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गणसंख्येअभावी तहकुब करण्यात आल्याने शिरुर च्या समस्यांबाबत नगरसेवकांना गांभिर्य नाही काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

गुरुवार (दि.३०) रोजी शिरुर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती.या सभेला नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्यासह विरोधीपक्ष नेते नगसेवक मंगेश खांडरे,नितीन पाचर्णे, निलेश गाडेकर हे उपस्थित होते. परंतु बहुतांश नगरसेवक या सभेला अनुपस्थित राहिले होते. नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी सदस्यांची सुमारे तरीही अर्धा तास वाट पाहिली परंतु अनेक जन गैरहजर राहिल्याने  अखेर गणसंख्येअभावी सभा तहकुब करण्यात आली.

यानंतर विरोधीपक्षनेते मंगेश खांडरे यांनी पञकारांशी बोलताना  सांगितले कि, मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे, पुर्णत्वाचे दाखले आदी प्रश्नांच्या संदर्भात विषय उपस्थित केले होते.त्यावर अध्यक्षांनी पाच व्यक्तींची(नगसेवक) समिती स्थापन केली होती.या समितीने त्या संदर्भात अहवाल सादर करुन देणे गरजेचे असताना, या समितीने अहवाल तयार केला नसल्याचा आरोप खांडरे यांनी केला.या बैठकित तो अहवाल खांडरे मागणार होते.माञ तो अहवाल मागण्याच्या आधीच सत्ताधारी नगरसेवकांनी पळ काढल्याचा आरोप खांडरे यांनी केला.शहरातील उर्दु शाळा नव्याने विकसित करावी हा विषय ठराव पञिकेवर असताना खांडरे यांनी सांगितले कि, या शाळेच्या जागेवर सत्ताधारी गटाचा डोळा असुन या शाळेच्या जागेवर शाळेच्या इमारतीबरोबरच व्यावसायिक गाळे बांधण्याचा घाट असल्याचा आरोप खांडरे यांनी केला.माञ या ठिकाणी अद्ययावत शाळेची इमारतच बांधावी असे खांडरे यांनी ठणकुन सांगितले.

सर्वच ठिकाणी दबाव वाढल्याने सत्ताधारी गटाला उर्दु शाळा बांधायचीच नसुन आजची सभा झाली असती तर उर्दु शाळा बांधण्याचा ठराव त्यांना करावा लागला असता.त्यामुळेच आजची सभा तहकुब करण्यात आली असल्याचा आरोप खांडरे यांनी केला.तत्पुर्वी लोकशाही क्रांती आघाडीच्या वतीने लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक, नगरसेवक मंगेश खांडरे, निलेश गाडेकर, संजय बारवकर, चांदभाई बळभट्टी, वैशाली साखरे, महम्मद हुसेन पटेल, विक्रम पाचंगे, राजु शेख, आदींच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा व मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची भेट घेउन हुडकोची घरे नावावर करण्यासंदर्भात, उर्दु शाळा, जीवन विकास मंदिर  च्या शाळेच्या जागेवरील आरक्षण काढण्या बाबत, महिलांच्या स्वच्छता गृहाचा प्रश्न, तसेच पाणीपट्टी कमी करणेबाबत नागरिकांनी घेतलेल्या हरकती संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न या शिष्टमंडळाने उपस्थित केले.याला उत्तर देताना मुख्याधिकारी पोळ यांनी सांगितले कि,हुडको संदर्भात मंञालयात हि फाईल असुन सामान्य प्रशासन विभागाकडे अंतिम टप्प्यात आहे.उर्दु शाळा पाडणार नसुन ती विकसित करणार आहे.जिवन विकास मंदिर या शाळेच्या जागेच्या आरक्षण काढणे संदर्भात मागणीवर माञ पोळ यांनी काहीच उत्तर दिले नाही. महिलांच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नाबाबत जागा उपलब्ध नसल्याचे पोळ यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.

गणसंख्येअभावी सर्वसाधारण सभा हि काहि वर्षांत तहकुब होण्याची घटना घडल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असुन यामुळे नगरपालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.शहराच्या महत्वाच्या विषयांसदर्भात  जर नगरसेवकांना गांभिर्य नसेल,शहराच्या प्रश्नांसदर्भात चर्चा करण्यास वेळ नसेल तर या नगरसेवकांनी शहराच्या विकासाबाबत  गप्पा मारु नये अशा प्रतिक्रिया शहरातील नागरिकांच्या तोंडुन ऐकायला मिळत आहेत.

तर सायंकाळी उशिरा सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी आशिर्वाद या निवासस्थानी पञकार परिषद बोलावुन उर्दु शाळा ही बांधायचीच असुन मुलांना अधिकाधिक सुविधा प्राप्त करुन द्यायच्या आहेत.परंतु त्या ठिकाणी शाळा बांधण्यासाठी उर्दु शाळेबाबत सर्वांना विचारात घेउनच योग्य निर्णय घेतला जाईल.कोणीतरी वेगळा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.आमचा कोणाचाही विरोध नाही.पुढच्या सभेत चर्चा करुन या बाबत  निर्णय घेउ.आम्ही सर्वजण मिळुन हे काम करु.असे उपस्थितांना सांगितले.या पञकार परिषदेला नगराध्यक्षा वैशाली वाखारे, सभापती मुजफ्फर कुरेशी, नगसेवक अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार यांसह महिला नगरसेविका उपस्थित होत्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या