होय ! त्यांना दु:खाकडे लक्ष देण्यासाठीही आता वेळ नाही...

न्हावरे, ता.२ डिसेंबर २०१७ (सतीश केदारी) : त्याला अपघातात कमरेखालच्या संवेदना नाहिशा झालेल्या तर तो  समुद्राच्या लाटेत सापडुन अंथुरणाशी खिळलेला.परंतु यांना दु:खाकडे लक्ष देण्यासाठीही आता वेळ नसून यांच्या कामाचे राज्यभर कौतुक केलं जातयं.
शिरुर तालुक्यातील हे दोघे जण.परंतु संपुर्ण राज्यभर मैञीच्या नात्यांनी गंध पसरवत आपल्या कामाचा ठसा उमटवत असलेली उमदे तरुण.एकाचे नाव सुदर्शन जगदाळे तर दुसरा अजय हिंगे. हे दोघेही तरुण न्हावरे गावचे.शिरुर तालुक्यात एका पक्षाचे सोशल मिडियाचे काम प्रामाणिक करत असलेली हि दोन व्यक्तिमत्त्वे संपुर्ण राज्याला परिचित आहेत.परंतु यांची दोघांच्या आयुष्याची चित्तरकथा हि वेगळीच परंतु तितकिच आजच्या तरुणाईला प्रेरणादायी.

अजय हिंगे न्हावरे येथील हिंगेवस्ती येथे राहणारा हा तरुण.सुमारे बारा  वर्षांपुर्वी रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जात असताना भयंकर अपघात झाला.त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला तर या अपघातातुन अजय वाचला परंतु कमरेखाली संवेदना नाहीशा झाल्या त्या कायमच्याच.परंतु हा दु्:ख विसरले ते कायमचेच.अपघातानंतर सगळ्या स्मृती विसरुन गेल्या बारा वर्षांपासुन एका पक्षाचे काम करतोय अत्यंत निष्ठेने.सुरुवातील वेळ इतरञ वाया न घालवता  माजी आमदार अशोक पवार यांच्याशी एकनिष्ठ राहुन मेसेजद्वारे सतत संपर्क राबविला.त्या काळी फेसबुक व व्हॉट्सअप चा जमाना नसतानाही त्याने मेसेज द्वारे पक्षाची कामे लिखित संदेशाद्वारे हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली.अन तालुक्यातील प्रत्येकापर्यंत हा पोहोचला.कालांतराने अशोक पवार यांनी दखल घेतली अन त्याला सोयी-सुविधा पुरविल्याच परंतु जगण्यालाही बळ दिले ते आजतागायत.पवार हे कितीही घाईत असो कि व्यस्त परंतु दिवसात एकदातरी संपर्क साधुन या कार्यकर्त्याला विसरत नाहीत.सण-समारंभालाही एकटे राहु देत नाहीत.

सुदर्शन जगदाळे यांच्याविषयी लिहावे तेवढे कमीच आहे.हा अत्यंत उमदा तरुण.बारावी चे शिक्षण झाले अन कॉलेजच्या दुस-या वर्षाला(Agree-Bio teChnology)मोठ्या जोमाने शिकत होता.घरची परिस्थिती बेताची असताना अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेत होता.अत्यंत हुशार अन अभ्यासु अशीच त्याची सगळीकडे ओळख. कॉलेजला असताना मिञ-मैञिणींचा गोव्याला फिरायला जायचा बेत ठरला.या वेळी गोव्याला पर्यटनाचा आनंद लुटत असताना समुद्राच्या महाभयंकर लाटेत अडकला.सुदैवाने या घटनेत तो बचावला परंतु हाताची दहा बोटे, मान पाठ यांसह शरीराच्या संवेदना देवाने नेल्या कायमच्याच.या अपघाताविषयी सुदर्शन शी बोलत असताना अपघात हा केव्हांच विसरुन गेलो असल्याचे सांगत इश्वराच्या पुढे काय नसतं असे सांगत या जखमा मला कधीच कमजोर करत नसल्याचे सांगितले.अपघातानंतर अपंगत्व आल्यानंतर काही काळ खुप दु:ख करत बसलो.परंतु कालांतराने यातही सावरलो अन नवी भरारी घेण्याचे ठरवले.राष्ट्रवादीचे सोशल मिडियाचे काम हाती घेतले.नावासाठी काम करायचे नाही असे ठरवत काम सुरु केले.हातांच्या बोटांना संवेदना नसतानाही हे काम करत असल्याने कोणालाही आश्चर्य वाटेल इतक्या गतीने मोबाईल अन लॅपटॉप वर काम करत असल्याचे पाहुन धक्काच बसेल.पलंगावर नेहमी खिळलेला असला तरी सुदर्शन आजारपणाचा बागुलबुवा करत नाही.आई-वडील हेही मोठी सुदर्शनची काळजी घेत असल्यानेच त्याला सर्व शक्य होत  असल्याचे जगदाळे अभिमानाने सांगतो.सुदर्शन च्या कामाचे कौतुक माजी आमदार अशोक पवार यांनी केलेच परंतु ते ही या कार्यकर्त्याला कधीच विसरत नाही ना पवार कुटुंब.


सुदर्शन ने सोशल मिडियावर काम करत असताना सातासमुद्रापार शेकडो  नव्हे हजारो नव्हे तर दोन लाखांच्यावर मिञांचा "एक कोटी अजित पवार समर्थक " हा ग्रुप तयार केला असुन या माध्यमातुन लाखो युवक सुदर्शन च्या नित्य संपर्कात असतात.सुदर्शन च्या प्रामाणिक कार्याची भुरळ पडली ती सुप्रिया ताई अन अजित दादांनाही.शिरुर तालुक्यात घोडगंगा कारखान्यावर  जेव्हा-जेव्हा अजित दादा येतात.तेव्हा ते या कार्याची विचारपुस केल्याशिवाय कधीच जात नाही.मागील महिन्यात धनंजय मुंडे यांनी ही सुदर्शन ची आस्थेने विचारपुस करुन मनापासुन धन्यवाद दिले.

एक कोटी चे राज्यभर लाखो चाहते
सुदर्शन ने तयार केलेल्या एक कोटी अजित पवार समर्थक समुहावर कुतुहलापोटी अधिक माहिती घेतली असता दिवसाला ७००-८०० व्यक्तींची मैञी साठी रिक्वेस्ट येतात.तर दिवसात दोन हजार च्या पुढे पोस्ट स्विकाराव्या या साठी विनंत्या येतात.सुप्रिया ताईंनी सेल्फी विथ खड्डा ही मोहिम राबविल्यानंतर सर्वात जास्त फॉलॉवर याच ग्रुपवर असल्याने राज्यभर त्याची दखल घेतली.शिरुर तालुक्यातील कार्यकर्ता, नेता असो कि राज्यभर पक्षाशी जोडला गेलेला युवक एक कोटी ग्रुप चा चाहता  बनला असुन सुदर्शन ने स्वत:च्या कामाने बड्या-बड्या नेत्यांना भुरळ पाडली आहे.तुम्हांला भुरळ न पडली तर नवलच !

दोन तरुणांची घेतलीय राज्यस्तरावर दखल
सुदर्शन जगदाळे असो कि अजय हिंगे हे दोन युवक मैञीतही कुठेही कमी पडत नाहीत.स्वत: मितभाषी परंतु गोड स्वभावाची त्यामुळेच या दोघांना भेटल्याशिवाय शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीचा येणारा कोणताही नेता पुढे जातच नाही.सुदर्शन व अजय  यांनी गेल्या अकरा-बारा वर्षांपासुन अंथुरणाला खिळुन असुनही व स्वत:चे दु:ख विसरुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.अपघात झाला म्हणुन काय आभाळ कोसळला काय ? म्हणुन अंधकार नष्ट करुन कोणतंही काम करा पण निष्ठेने करा असे दोघेही सांगत असताना सुदर्शन ची राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडियाच्या सचिव पदी तर अजय हिंगे यांची राज्याच्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली.राज्यभरात पक्षाचे अनेक कार्यकर्ते काम करत असताना या तरुणांची पक्षाने दखल घेतली.परंतु नियुक्तीचे पञेही राज्याचे युवक चे उपाध्यक्ष व सोशल मिडिया प्रमुख रविकांत वर्पे व राज्याचे सरचिटणीस अभिषेक बोके यांनी घरी येउन समारंभपुर्वक दिली. या वेळी त्या दोघांच्या जिद्दीचे कौतुक केले.

आभाळ कोसळलं म्हणुन हताश होउ नका

सुदर्शन शी याबाबत संवाद साधला असता, जीवनात चढ-उतार येत असतात.तुमचं दु:ख किती मोठं हे जगाला दाखवु नका.तुम्ही काय करता हे जगाला दाखवुन द्या तरच तुमचं जगणं सुसह्य होतं असं सुदर्शन आवर्जुन सांगतो.त्यामुळे आजच्या प्रत्येक क्षेञात काम करणा-या यांच्या जिद्दीला सलाम करावा लागतोय हे माञ नक्की.
संपर्कासाठी :
सुदर्शन जगदाळे : ९८५०१९२२८१
अजय हिंगे : ९४०३७७३४३४

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या