विद्याधाम व संभाजीराजे महाविद्यालय युथ चॅम्पीयनशिपचे मानकरी

तळेगाव ढमढेरे, ता. 5 डिसेंबर 2017 (एन. बी. मुल्ला): शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप स्पर्धेत विद्याधाम प्रशाला व छत्रपती संभाजीराजे महाविद्यालय विजयी झाले असून, युथ चॅम्पीयनशिपचे मानकरी ठरले आहेत.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात महाराष्ट्र पोलिस आयोजित युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप गट पातळीवर शिक्रापूर पोलिस ठाणे अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी व वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते बारावी गटात शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेच्या राधा नारायण सोळंके, र्इश्वरी सुभाष खैरे व वैष्णवी दत्तात्रय शिंदे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीरच्या युवराज अंकुश शिंदे, अश्लेषा गणपत घोलप, ऋतुजा किसन वडघुले या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.

महाविद्यालयीन गटात छत्रपती सभाजीराजे महाविद्यालयाच्या पायल राजेंद्र खलाटे, जयश्री शांताराम वर्पे व गणेश सुदाम पिंगळे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.दोन्ही गटातील विजेत्या संघांची उपविभागीय पातळीवर होणाऱया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मॄतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, डी.एस.शिंदे, पोलिस नार्इक अनिल जगताप, योगेश नागरगोजे, शिक्षक परीषदेचे जिल्हा संघटक प्रा.संजीव मांढरे, तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला, प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, डॉ.पराग चौधरी, डॉ. संदीप सांगळे, डॉ. रविंद्र भगत, शेरखान शेख, सुनिल भोंगळ, दत्तात्रय वडघुले, नामदेव भोर्इटे, प्रा.नानासाहेब गावडे, शंकर आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.र्इश्वर पवार व प्रा.विजय अंधारे यांनी काम पाहीले.विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा व सामाजीक समस्या सोडविण्याची युवकांमध्ये जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेतून युथ पार्लमेंट हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी  प्रास्ताविकात पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगीतले. प्रा. संदीप सांगळे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. पराग चौधरी यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या