शिरुर बसस्थानकातून महिलेचे २९ तोळे दागिने लंपास

शिरूर, ता.१२ डिसेंबर २०१७ (प्रतिनिधी) : शिरूर शहरातील बस स्थानकातून महिलेच्या पिशवीतून एकोणतीस तोळ्याचे पाच लाख एकाव्वन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून  नेल्याची घटना घडली. या संदर्भात शोभा मच्छिंद्र जाधव (वय ४६.रा.एकता वसाहत, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली  असून हि घटना मंगळवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा जाधव ह्या अहमदनगर या आपल्या गावाहून त्यांच्या माहेरी गावी निर्वी या ठिकाणी चालल्या होत्या. त्यांची माहेरी निर्वी या ठिकाणी त्यांच्या आजी कलावती बापूराव सोनावणे यांच्या वयाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमाला जाधव ह्या चालल्या होत्या.  त्यामुळे त्यांनी नगरहून त्यांच्या स्वतःचे तेच मुलीचे व पतीचे असे मिळून २९ तोळ्याचे (पाच लाख एकाव्वन हजार रुपयांचे) दागिने घेवून त्या निघाल्या होत्या.

नगरहून त्या निर्वीकडे जाण्यासाठी निघाल्यानंतर शिरूर येथे आल्यानंतर त्या निर्वी या गावी जाण्यासाठी त्या दुपारी शिरूर ते तांदळी या बस मध्ये बसल्या. बस मध्ये चढताना बसला खूप गर्दी होती. बस मध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीत असलेले दागिने अज्ञात चोरट्याने पिशवीत हात घालून चोरून नेले. त्या नंतर जाधव या साडे चार वाजता निर्वी या ठिकाणी पोहचल्या नंतर त्यांनी पिशवी तपासणी केल्यानंतर त्या पिशवीत हे दागिने सापडले नाही. या चोरीत दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, साडेपाच तोळे वजनाचा गंठण, तीन तोळ्याचा गांठण, अडीच तोळ्याचा सोन्याचा राणी हार, साडे पाच तोळ्याच लक्ष्मि हार, दीड तोळ्याचे कानातील सोन्याचे फुले, साडे तीन तोळ्याची मोहन माळ, दीड तोळा सोन्याची गोफ, अडीच तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठ्या, आर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र आदी माल या चोरी गेला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करत आहेत. या घडलेल्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या