खंडाळ्यात घरगुती वादातून चुलतभावाचा खून

रांजणगाव गणपती, ता. २२ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : खंडाळे (ता. शिरुर) येथील खेडकर मळा येथे घरगुती कारणावरुन एकाची डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
प्रकाश मच्छिंद्रनाथ खेडकर (वय ३४) असे मयत व्यक्तीचे नाव असून, मच्छिंद्रनाथ सिताराम खेडकर यांनी या प्रकरणी पोलीसांत फिर्याद दिली आहे. रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी विकास बबन खेडकर याने फिर्यादीचा मुलगा हा नेहमी घरगुती कारणावरुन भांडण करत होता. व ञास देत होता हा राग मनात धरुन गुरुवारी (ता. २१) रोजी राञीच्या सुमारास आरोपी विकास याने प्रकाश याच्या डोळयात मिरची पुड टाकली. त्यानंतर लोखंडी अॅंगलने पायावर मारहाण करुन खाली पाडले व डोक्यात दगड घालून खून केला.

घटनेची वार्ता समजताच रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, चंद्रकांत काळे, मंगेश थिगळे आदींनी  घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. तसेच तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीस तत्काळ अटकही केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर गोरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या