www.shirurtaluka.comच्या कॅलेंडरचे प्रकाशन !

शिरुर, ता.२८ डिसेंबर २०१७ (तेजस फडके): गेल्या सात वर्षांपासून शिरूर तालुक्यातील नागरिकांवर अधिराज्य गाजविणाऱया www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने यंदा ऑनलाइन कॅलेंडर प्रकाशीत केले आहे. संकेतस्थळ व सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे ऑनलाइन कॅलेंडर तब्बल पाच नेटिझन्सपर्यंत पोहचविले जाणार आहे.

राज्यातील पहिल्या तालुक्याचे संकेतस्थळ तयार करण्याचा मान मिळविणाऱया www.shirurtaluka.comच्या ई-दिनदर्शिकेचे प्रकाशन पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली व शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, महिला आघाडी प्रमुख विजयाताई टेमगिरे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, प्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख दिपक काळे, संकेतस्थळाचे संस्थापक संतोष धायबर, कार्यकारी संपादक सतीश केदारी, पत्रकार संपत कारकूड, तेजस फडके यांच्या हस्ते बुधवारी (ता. 27) शिरूर बाजार समितीच्या कार्यालयात पार पडले.
पञकारांनी समाजभान जपावे- राजेंद्र कुंटे
शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे म्हणाले, 'पञकार हा लोकशाहीचा कणा असून, पञकारांनी बातम्या देताना समाजभान जपणे गरजेचे आहे. समाजात काम करत असताना नेहमी अनेक घटना घडत असतात. एका बातमीमुळे कोण एका राञीत स्टार होऊ शकतो तर राञीत उद्धवस्तही होऊ शकतो. त्यामुळे माध्यमांनी व पञकारांनीही या घटनांचा मागोवा घेताना आततायीपणा टाळणे गरजेचे आहे.'
सोशल मिडियात अमुलाग्र बदल: शशिकांत दसगुडे
सभापती शशिकांत दसगुडे यांनी बोलताना सांगितले कि, 'दिवसेंदिवस माध्यमे बदलत असून सोशल मिडियात अमुलाग्र बदल होताना दिसत आहे. सोशल मिडियाचा गैरवापर ही मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असला तरी या सारखे प्रभावी दुसरे नाही.
संकेतस्थळाचे कौतुकः राजेंद्र जगदाळे
जिल्हा परिषद राजेंद्र जगदाळे यांनी संकेतस्थळाच्या कामाची व वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती घेऊन विशेष कौतुक केले.

डिजिटल मिडियालाच भविष्यात 'अच्छे दिन': संतोष धायबर

संकेतस्थळाचे संस्थापक संतोष धायबर यांनी संकेतस्थळाच्या कामांचा मागोवा घेत वेगवेगळे माध्यमे या प्रवाहात येत आहेत. वृत्तपञांबरोबरच डिजिटल मिडियालाच भविष्यात 'अच्छे दिन' येणार असल्याचे मत व्यक्त केले.

मान्यवरांकडून शुभेच्छा...
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, महिला आघाडी प्रमुख विजयाताई टेमगिरे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ आदींनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन तेजस फडके यांनी केले. या वेळी बाजारसमितीचे संचालक बंडू जाधव, कृष्णकुमार माने, संगणक अभियंते हृषीकेश पवार, रेलफॉर कंपनीचे अधिकारी नितीन घोडके कार्यकारी आदी उपस्थित होते.

कॅलेंडरविषय़ी थोडक्यात...

  • ऑनलाइन कॅलेंडर हे वर्षभर संकेतस्थळाच्या मुख्यपानावर उपलब्ध राहणार.
  • पीडीएफ स्वरूपात कॅलेंडर असल्यामुळे वाचकांना मोबाईमध्ये मोफत डाऊनलोड करता येणार.
  • डिजीटल कॅलेंडर असल्यामुळे सातत्याने जाहिरातींमध्ये बदल केले जाणार.
  • फेसबुक, व्हॉट्सएपच्या माध्यमातून पाच लाख नेटिझन्सपर्यंत कॅलेंडर पोहचणार.
  • कॅलेंडर जाहिरातींसाठी संपर्कः सतीश केदारी- 8805045495, तेजस फडके- 9766117755, संपत कारकूड- 9823561922, shirurtaluka@gmail.com
संबंधित बातमीः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या