भीमा कोरेगाव नव्हे कोरेगाव भीमा...

कोरेगाव भीमा, ता. 3 जानेवारी 2018: कोरेगाव भीमा येथे सोमवारी (ता. 1) झालेल्या दंगलीनंतर अनेकांनी गावाचे नाव बदलले आहे. कोरेगाव भीमा या गावाचा उल्लेख चक्क भीमा कोरेगाव असा केला जात आहे.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगचा आधार घेतला. विविध प्रसारमाध्यमांनीही पडताळणी न करता गावचा उल्लेख भीमा कोरेगाव असा केला आहे. यामुळे एकाची कॉपी दुसऱयाने करत गावाचे नावच चक्क बदलले गेले.
सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीची पडताळणी केली जात नाही. कोणी एकाने भीमा कोरेगाव केले. त्याचीच री पुढे अनेकांनी ओढली. यामुळे गावचे नावच बदलले गेले. सोशल नेटवर्किंगवरही भीमा कोरेगाव असा ट्रेंण्ड आला आहे. यामुळे सोशल नेटवर्किंगवर कोणतीही पडताळणी केली जात नसल्याचे सिद्ध होत आहे. अशाच प्रकारे अफवांवरही विश्वास ठेवल्याचे प्रकार घडत आहेत.

यामुळे दंगलीनंतर कोरेगाव भीमा या गावाचा उल्लेख भीमा कोरेगाव या चुकीच्या पद्धतीने केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या