कोरेगाव भीमाचे वृत्त संकेतस्थळाने थांबविले जाणीवपूर्वक

कोरेगाव भीमा, ता. 3 जानेवारी 2018: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. 1) दंगल उसळली होती. परंतु, शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने याचे वृत्त सोमवारी जाणीवपूर्वक थांबविले होते.

कोरेगाव भीमासह नगर महामार्गावर सोमवारी दंगल उसळली होती. यावेळी अनेकजण www.shirurtaluka.com च्या प्रतिनिधींना दुरध्वनी करून विचारणा करत होते. शिवाय, संकेतस्थळावरही वृत्त जाणून घेण्यासाठी अनेकजण भेट देत होते. परंतु, दंगलीच्या काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये अथवा अफवा पसरून त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणून जाणीवपूर्वक संकेतस्थळाने सोमवारी कोणतेही वृत्त दिले नव्हते. सोमवारी पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आणली होती. यामध्ये प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे.

परंतु, सोशल नेटवर्किंगसह बाहेरील प्रसारमाध्यमांनी मंगळवारी वृत्त प्रसारीत करण्यास सुरवात केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर पसरू लागले.
मुख्यमंत्र्यांकडून प्रसारमाध्यमांचे आभार...
प्रसारमाध्यमांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल मंगळवारी (ता. 2) मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या