शिरुर शहरात दिवसभर कडकडीत बंद

शिरूर,ता.३ जानेवारी २०१८ (अभिजित आंबेकर) : कोरेगाव भिमा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३ जानेवारी रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.

महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर आज शिरूर शहरातील विविध संघटनाच्या वतीने या बंद मध्ये सहभाग घेतला होता.आज सकाळी शिरूर शहरातून एका मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. हा बंद शांततेत पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार या वेळी घडला नाही.संपूर्ण शहरातील व्यवहार सकाळपासून बंद होते.शहरातील सर्व बाजार पेठा ह्या बंद होत्या भाजी बाजारावर सुद्धा या बंदचा परिणाम झाला.या बंद मुळे शहरात शुकशुकाट पहावयास मिळाला.

शहरातील महाविद्यालय व शाळा ह्या मात्र चालू होत्या,या बंद मुळे वाहतुकीवर परिणाम दिसत होता. शहरातील एस.टी.बस स्थानकावर सुद्धा एस टी ह्या तुरळक दिसत होत्या. लांब पल्याच्या एस टी मात्र आज फिरकल्याच नाही त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.या बंद च्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात शिरूर पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौका चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शिरसगाव काटा येथेही नागरिकांनी बंद पाळुन निषेध व्यक्त केला.
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या