राहुलच्या मारेकऱ्यास अटक करण्याची सणसवाडीत मागणी

सणसवाडी, ता. 5 जानेवारी 2018: सोमवारी (ता. 1) हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत राहुल फटाकडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्याच्या कुटुंबीयांस एक कोटीची भरपाई द्यावी, स्थानिकांच्या मालमत्तेची नुकसानभरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सलोखा बैठकीत गुरुवारी (ता.4) केली.

सणसवाडीत सोमवारी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात सणसवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांसह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सणसवाडीत सोमवारी झालेल्या घटनेत स्थानिक राहुल फटाकडे या तरुणाला जीव गमवावा लागला. शिवाय, ग्रामस्थाच्या मालमत्तेचे, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

सणसवाडीत कोणतीही जातीयवादी संघटना नाही. गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहात असून, जातीय वाद नाहीत. दरवर्षी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांना ग्रामस्थांनी यापूर्वी सुविधा पुरविल्या आहेत. यापुढेही त्यांचे स्वागतच होईल, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. बाहेरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनीच दंगल पसरवली. त्याचा मोठा फटका वढू-कोरेगावबरोबरच सणसवाडीतील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर बसला, असे म्हणणे ग्रामस्थांनी मांडले.

कोरेगाव भीमा येथे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची मनोमीलन
कोरेगाव भीमाचे नाव बदनाम होत असल्याची तक्रार कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी केली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे आज मनोमीलन झाले. येथील विजयस्तंभास अभिवादनासाठी दर वर्षी येणा-या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, अशीही ग्वाही आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही बाजूंच्या महत्वांच्या घटकांनी समन्वयाची बैठक घेतल्याने गावातील वातावरण सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या