गावातून जाऊन आलो असे म्हणत राहुल गेला... (Video)

सणसवाडी, ता.६ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : आमच्या राहुलचा यात नाहक बळी गेला असून समाजाने जात-पात न मानता  माणुसकीच्या नात्यानं सलोखा ठेवावा अशा भावना कोरेगाव भिमा दंगलीतील मयत राहुल फटांगडे च्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.
शिरुर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी रोजी दंगल उसळून जाळपोळ करण्यात आली. या दंगलीदरम्यान सणसवाडी येथे राहणारा युवक राहुल फटांगडेचा दुर्दैवी मृत्यु झाला. याबाबत शिरुर तालुक्यात अग्रणी असलेल्या www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने कुटुंबियांची भेट घेउन भावना जाणुन घेतल्या. या वेळी कुटुंबातील सदस्यांनीही भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या.

राहुल याचा भाऊ विष्णू हा पुणे ग्रामीण पोलीस दलात पुणे शहरात कार्यरत आहे. राहुलबाबत  बोलताना कुटुंबियांनी सांगितले कि, राहुल हा सर्वांशी मनमिसळून राहायचा. काम भलं अन आपण अशा प्रकारे तो चंदननगर येथे दुचाकीचे गॅरेज चालवत होता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी राहुल हा घरी होता. कामावर न जाता घरातील काही नळदुरुस्तीचे काम चालू होते. गावातून जाऊन आलो असे म्हणत कामानिमित्त एकटाच गेला होता. त्या वेळी अघडित घडेल याची किंचितशी कल्पना आम्हांला नव्हती. आमच्या राहुलचा ना दंगलीशी ना राजकारणाशी संबंध होता. यात त्याचा हकनाक बळी गेला असून राहुल समाजाने जात-पात न मानता  माणुसकी म्हणून या घटनेकडे पाहत सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन पिडित कुटुंबाने बोलताना केली. 


राहूल हा फटांगडे कुटूंबाचा मोठा सदस्य होता. राहूलचा एक भाऊ पुण्यामध्ये पोलिस असल्याने राहूलच्या आईची जबाबदारी सर्व राहूल वरती असल्याने घरचा कर्ता पुरूष गेल्याने फटांगडे कुटूंबावरती शोककळा पसरली आहे. तरीही पिडीत राहूल च्या कुटूंबीयांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या