शिरुर बाजारसमितीच्या सभापतींची राहुलच्या कुटुंबियांना मदत

शिरुर,ता.६ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे दंगलीत दुर्दैवी मृत्यु झालेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियांना शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांच्यावतीने नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली.
सणसवाडी येथे १ जानेवारी दंगल उसळल्यानंतर सणसवाडी येथील तरुण राहुल फटांगडे याचा दंगलीत दुर्दैवी मृत्यु झाला. राहुल फटांगडे हा घरातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्यावरच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती.शासनाने मदतीची घोषणा केली आहे परंतु त्या अगोदरच शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेउन थेट घरी जाऊन कुटुंबाची भेट घेउन सांत्वन केले आहे.तसेच मदत  देउ केली आहे.या वेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांतभाऊ दसगुडे,मा.उपसभापती वाल्मीकराव कुरंदळे,संचालक विजेंद्र गद्रे,बंडू जाधव, सचिव दिलीप मैङ आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या