राहुल फटांगडे या तरुणाचे खरे मारेकरी शोधून काढावेत...

तळेगाव ढमढेरे, ता. 7 जानेवारी 2018 (एन. बी. मुल्ला): येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या हॉलमध्ये कोरेगाव भीमा, सणसवाडी येथे झालेल्या घटनेच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल फटांगडे या तरुणाचे खरे मारेकरी शोधून काढावे अशा मागण्यांचे निवेदन शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांना देण्यात आले.
कोरेगाव भीमा, सणसवाडी येथे उसळलेल्या दंगलीमध्ये काही समाजकंटकांनी जाळपोळ करून गावामध्ये नासधूस करून दगडफेक केली आणि राहुल फटांगडे या तरुणाचा निर्घुण खून केला, या सर्व बाबींचा निषेध करण्यात आला. यामध्ये सर्व जातीधर्माचे लोकांवर अन्याय झाला असताना मात्र भीमसैनिक व दलित संघटना यांच्यावर अन्याय झाल्याचा खोटा कांगावा करत पोलिस प्रशासनावर दबाव आणून खोट्या तक्रारी तत्काळ थांबवाव्यात तसेच स्थानिक नागरिकांवर आट्रोसिटीच्या गुन्हा दाखल करू नये, राहुल फटांगडे या तरुणाचे खरे मारेकरी शोधून काढावे अशा मागण्या निवेदनात देण्यात आल्या. यावेळी रवींद्र काळे यांनी आपल्या भाषणात दोषीवर कारवाईची मागणी केली तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा अरोप ठेवण्यात आले, येथील नागरिकांनी स्वरक्षणासाठी दगडफेक केली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशिद, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेना तालुकाध्यक्ष पोपट शेलार, काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव यादव, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष मिनाक्षी कुरूंदळे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गायकवाड, रांजणगाव देवस्थानचे विजय दरेकर, कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, माजी सभापती अरविंददादा ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, विश्वास कोहकडे, उपसरपंच रमण दरेकर, दत्तात्रय हरगुडे, शिवाजी दरेकर, पंडित दरेकर, ग्रामपंचायतीचे सदस्य विजय ढमढेरे, सुधीर ढमढेरे, नामदेव दरेकर, नवनाथ हरगुडे, सर्जेराव दसगुडे, मारुती कामठे, बापूसाहेब शेळके, निंबाजी साठे, दादासाहेब भोंडवे, युवराज दरेकर, सोमनाथ शेळके व परीसरातील नागरिक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या