पत्रकारांचे लेखनीद्वारे समाज परीवर्तनाचे काम: पाचर्णे

शिरूर, ता.९ जानेवारी २०१८ (संतोष शिंदे) : पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असुन शस्रापेक्षाही जास्त धार लेखनीला आहे.पत्रकार आपल्या लेखनीद्वारे सकारात्मक दृष्टीने लेखन करून समाज परिवर्तनाचे चांगले काम करत असतात असे मत शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केले.
६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने बो-हाडे मळा ता.शिरूर येथील गोकुळ वृध्दाश्रमात सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले तसेच अन्न - धान्य,ब्लँकेटचे व औषधांचे वाटप वृध्दाश्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या वतीने करण्यात आले.यावेळी आमदार पाचर्णे बोलत होते.पत्रकारांच्या लेखनीत मोठी ताकत असुन ते लेखनीच्या आधारे समाजाला दिशा देण्याचे अतिशय चांगले काम करत असतात असे पुढे बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले.

यावेळी तहसिलदार रणजीत भोसले,गटविकास अधिकारी संदिप जठार,पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे,नगरसेवक विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे,पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे,समता परीषदेचे किरण बनकर,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पोपट शेलार,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,गोकुळ मुथा,धन्यकुमार मुथा,संतोष मुथा,पारस मुथा,अस्थिरोगतज्ञ डॉ.आकाश सोमवंशी,जनरल फिजीशियन डॉ.अखिलेश राजुरकर,डॉ.विशाल महाजन,डॉ.तुषार नरवडे,डॉ.किरण तायडे, डॉ.प्रियांका खंदारे,स् रीरोगतज्ञ डॉ.अनुराग भोंडवे,भुलतज्ञ डॉ.धनंजय पोटे,रेडीओलॉजीस्ट डॉ.अमोल खोडदे,ग्रामिण रूग्णालयाचे फार्मासिस्ट सारीका दातीर, त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष शेरखान शेख, अर्जुन बढे, भाऊसाहेब खपके, तेजस फडके, अप्पासाहेब ढवळे, सूर्यकांत शिर्के, सुनील पिंगळे, राजेंद्र वारघडे, मंदार तकटे, संतोष गुंजवटे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते

यावेळी बोलताना तहसिलदार रणजीत भोसले म्हणाले की, महाराष्ट्र रज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राबवण्यात येणा-या विविध उल्लेखनिय स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करून अभिनंदन केले.तसेच वृध्दाश्रमातील वृध्दांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व सुत्रसंचलन संजय बारवकर यांनी तर आभार अर्जुन बढे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या