'त्या' बुलेटस्वारांनी शिरुर पोलीसांना केलयं 'चॅलेंज'

शिरुर,ता.१० जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर शहरात अज्ञात बुलेटस्वारांकडुन भुलवुन एकाला ५० हजाराला लुबाडण्याची घटना घडली. अशा पद्धतीने नागरिकांना लुबाडण्याची पाचवी घटना घडली असुन शिरुर पोलीसांसमोर त्या धुमस्टाइल चोरी करणा-या चोरट्यांना जेरबंद करणे  एकप्रकारे आव्हान निर्माण झाले आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,या प्रकरणी राजेश राघव दुबे (वय.३९,रा.मुंबई बाजार) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दुबे हे शिरुर मध्ये राहावयास असुन ते रेव्हेन्यु कॉलनी येथे संगणक प्रशिक्षन केंद्र चालवतात.मंगळवार(दि.९) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास  राजेश दुबे हे त्यांचा मुलगा  रोहन सह त्यांच्यासोबत असलेली ५० हजाराची रक्कम घेउन पैसे ट्रान्सफर करण्याकामी बॅंक अॉफ इंडिया समोर असलेल्या कार्यालयाकडे चालले होते.ते राहत असलेल्या मुंबई बाजार येथील सदनिकेच्या खाली पार्किंग मध्ये फिर्यादीचा मुलगा  रोहन याने दुचाकी बाहेर काढली.त्यावेळेस फिर्यादी हे रस्त्याच्या कडेला उभे होते.त्याचवेळेस त्यांच्यासमोर बुलेटवरुन दोन इसम जवळ येउन थांबले.व जवळ येउन सुइज कॉम्पलेक्स कुठे आहे असे विचारले.त्यावेळी दुबे यांनी मुझे मालुम नही असे हिंदीत सांगितले.त्यावेळेस त्या दोन इसमांनी तुम्ही हिंदी कि मराठी असे विचारले.त्यावेळेस दुबे यांनी मी हिंदी आहे असे सांगितले.तेवढ्यात दुचाकीवरुन एक खाली उतरुन जवळ येउन का रे घाबरतो असे म्हणत मी तुझा मिञ आहे असे सांगितले व दुबे यांना कवटाळले.त्याचवेळेस फिर्यादीचा मुलगा  जवळुन येउन  वडिलांना सोडा असे म्हणाला व त्या इसामांना धक्का दिला.त्यानंतर सदर दोन्ही इसम पुन्हा काही अंतरावर जाउन थांबले.तर फिर्यादीचा मुलगा दुचाकी सुरु करण्यासाठी गेला.तेव्हा परत यातील इसम फिर्यादी जवळ येउन उचलल्यासारखे केले.व त्यानंतर दुबे यांना पुन्हा सोडुन दुचाकीवर पळुन गेले.त्यानंतर फिर्यादी हे गाडीवर बसले.व  खिसे तपासले असता खिशातील रक्कम ५० हजार चोरी गेले असल्याचे लक्षात आले.यानंतर फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेउन अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दिली आहे.घटनेनंतर पोलीसांना माहिती कळताच पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.परंतु त्या चोरांचा मागोवा लागु शकला नाही.या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

गेल्या आठ दिवसांपुर्वी अशाच पद्धतीने या बुलेट स्वारांनी एका  इसमाला भुलवुन ५० हजार रुपये रक्कम लंपास केली होती.तर याच पद्धतीने गुन्हा करुन पळुन जाण्याची हि पाचवी घटना घडली आहे.या मुळे या धुमस्टाइल चोरी करुन पळुन जाणा-या बुलेटस्वारांना जेरबंद करणे हे शिरुर पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या