मिलाप कार्यक्रमात रंगणार कविता-गजलांची मैफिल

पुणे,ता.१० जानेवारी २०१८(सतीश केदारी) : ज्ञानपीठ फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मिलाप या कविता -गजलांच्या मैफलीस महाराष्ट्रातील नामवंत कवी, गजलकारांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती संयोजक कुमार अभंगे, अनुराधा हवेलीकर, किर्ती हरिभक्त, प्रवीण भाकरे आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ.श्याम पाटील तेलंग यांनी दिली आहे.
 
याविषयी सविस्तर माहिती अशी कि,नांदेड येथील पीपल्स कॉलेज परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात २८ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता मिलाप हा आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन या कार्यक्रमात राज्यस्तरीय साहित्य प्रतिभा गौरव पुरस्कार २०१७ आणि प्रेरणा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा.डॉ.जगदीश कदम, साहित्यिक देवीदास फुलारी, ख्यातनाम समीक्षक संजय बोरुडे(नगर), प्रा.महादेव रोकडे(पुणे), प्रा.डॉ.सुहास सबनीस(मुंबई),उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी),बापू दासरी(नांदेड), सोलापूर,गजलकार विजय वडवेराव(पुणे), अरविंद सगर (परभणी),रत्नाकर जोशी(जिंतूर) आत्माराम जाधव(राणी सावरगाव), कांचन वीर, नेरपरसोपंत,अर्चना डावरे,ज्योती सोनवणे, आशा डांगे(औरंगाबाद), कवी व्यंकटेश चौधरी, निशांत पवार(नांदेड) यांच्यासह अनेक नामवंत लेखक -कवींची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.महेश मोरे,प्रा.शंकर विभूते,विजय चव्हाण,शंकर राठोड, डॉ. माधव कुद्रे, सोनाली आचेगावकर, प्रा़.व्यंकटी पावडे, वसुंधरा सुत्रावे, शिवाजी होळकर,सारिका बकवाड, श्रीनिवास मस्के, अमृत तेलंग, बालाजी पेटेकर, दीपक सपकाळे,पांडुरंग पुठ्ठेवाड, पांडुरंग कोकूलवार, व्यंकटेश काटकर,अॅड. सावित्री दमकोंडवार, ज्योती गायकवाड, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, सतीश केदारी(शिरुर,पुणे),भारत कांबळे,संदीप भुरे, राजू मोरे, राज ठाकूर, सुनील पाटील, प्रणव बोडके,गजानन सावंत,भागवत देवसरकर,बालाजी पोगुलवाड, अनिल बलखंडे, रघुनाथ पोतरे, अमित पवार ,लखन कावळे यांच्यासह अनेकजण परिश्रम घेत आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त काव्य प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यक्रमास येतांना किमान एक वही पेन आणावी असे आवाहन संयोजक कुमार अभंगे, अनुराधा हवेलीकर,कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डाॅ.श्याम पाटील तेलंग यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या