विठ्ठलवाडी-तळेगाव ढमढेरे रस्त्याची पहा दुरावस्था...

तळेगाव ढमढेरे, ता. 12 जानेवारी 2018 (एन. बी. मुल्ला): विठ्ठलवाडी-तळेगाव ढमढेरे रस्त्याची दुरावस्था झाली असून, सर्वत्र खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाल्याने या रस्त्याने वाहतूक करणे जिकीरीचे झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
विठ्ठलवाडी-तळेगाव ढमढेरे हा वर्दळीचा रस्ता असल्याने तसेच हा रस्ता उरूळी कांचन, राहू व नगर रस्त्याला जोडलेला असल्याने मोठया प्रमाणात मालवाहतुक व प्रवासी वाहतुक सुरू असते. शेतमाल व वाळू वाहतूकही मोठया प्रमाणात या रस्त्याने होते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने व सार्इडपट्टया तुटल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. विठ्ठलवाडी येथील मेन चौकात देखील रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले आहेत. शाळेत सायकलवर जाणाऱया विद्यार्थ्यांना देखील कसरत करावी लागत आहे. तर येथील नागरीकांना या रस्त्यावरून चालणे देखील मुश्किलीचे ठरत आहे. तरी या धोकादायक रस्त्याची  तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

दरम्यान, www.shirurtaluka.com ने शिरूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मालिका सुरू केली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी लवकरच रस्ते दुरूस्त होतील असे सांगितले आहे. परंतु कधी होणार हे माहित नाही. शिरूर तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करतानाच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामुळे शिरूर तालुक्यातील रस्ते कधी दुरूस्त होणार याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या