कोरेगाव भिमा दंगलीतील १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी

शिरुर, ता.१२ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : कोरेगाव भिमा(ता.शिरुर) येथे झालेल्या दंगलप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना शुक्रवार(दि.१२) रोजी सायंकाळी शिरुर न्यायालयात हजर केले असता १३ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती शिक्रापुर पोलीसांनी दिली.
१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात झालेल्या दंगल प्रकरणी पोलीसांनी धरपकड करत आरोपी अटक  केले होते.यातील या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलीस कोठडी संपल्यानंतर  आज शुक्रवार (दि.१२) रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात आरोपींना न्यायालयात आणण्यात आले.यावेळी न्यायालयासमोर हजर केले असता १३ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या