कोरेगाव भिमा दंगलीत नुकसान झालयं ९ कोटी ६४ लाखाचं

कोरेगाव भीमा, ता.१३ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : कोरेगाव भिमा व सनसवाडी येथे झालेल्या दंगलीत ९ कोटी ६४ लाखाचं नुकसान झालं असल्याचे समोर आले आहे.
१ जानेवारी रोजी कोरेगाव भिमा व सणसवाडी येथे झालेल्या दंगलीत जमावाकडुन दगडफेक, तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती.या जाळपोळीत स्थानिकांसह अनेकांचे नुकसान झाले.यात मोठ्या प्रमानावर वाहनांची जाळपोळ करण्यात आली त्याचबरोबर तोडफोडही करण्यात आली होती.

त्यानंतर शिरुर तालुक्यातील महसुल प्रशासनाच्या वतीने तत्काळ पंचनामे करण्यात आले होते.यानंतर यातील प्रशासनाने पंचनाम्यानंतर केलेल्या नुकसानीची आकडेवारीची माहिती मिळाली.त्यानुसार प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार(दि.१ जानेवारी ते २ जानेवारी) कोरेगाव भिमा येथील दंगलीत एकुण चारचाकी वाहने-९२, दुचाकी वाहने-६८, तीनचाकी-१ तर घरे-१५, दुकाने/हॉटेल-६४, गॅरेज-४ असे मिळुन ७ कोटी २१ लाख १५ हजार ३४० रुपयांचं नुकसान झाले आहे.

सणसवाडी येथील दंगलीत चारचाकी वाहने-२८, दुचाकी-२८, तीनचाकी-४, घरे-४, दुकाने-१३, गॅरेज-९, बस-३, ट्रक-८, जेसीबी-१, अग्निशामक-१, हॉटेल-६ असे मिळुन २ कोटी ४३ लाख १० हजार ९२५ रुपयांचं नुकसान झालं आहे.या दोन्ही दंगलीत मिळुन एकुन ९ कोटी ६४ लाख २६ हजार २६५ रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली.

शिरुर तालुक्यात प्रथमच झालेल्या झालेल्या कोरेगाव भिमा व सणसवाडी येथील दंगलीत अनेकांचं नुकसान झालं असुन येथील नागरिकांनी शासनाने नुकसान भरपाई तत्काळ द्यावी अशी मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या