शिरूरमध्ये चोरटे चोरी कशी करतात पहा (Video)

शिरुर, ता.१४ जानेवारी २०१८ (विशेष प्रतिनीधी) : दुचाकीवर सावज हेरुन ते येतात..पत्ता विचारण्याचा बहाणा करतात अन नकळत खिशातील पैसे घेउन पळुनही जातात. तर अशा वेळी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

शिरुर शहरात गेल्या महिनाभरापासून शिरुर पोलीसांची डोकेदुखी ठरलेय एक चोरटयांची टोळी.या टोळीचा उद्देश एकच नागरिकांना भुलवुन पैसे  चोरी करणे. तर हे चोर दिवसाढवळ्या दुचाकीवरुन येतात.जवळ आल्यानंतर पत्ता विचारण्याचा बहाणा करतात. त्यानंतर जवळ येउन गोड बोलुन अलिंगन देतात.त्याचवेळेस खिशातील रक्कम घेउन धुमस्टाईल पद्धतीने पळून जातात.
अशा पद्धतीने या चोरट्यांनी चो-या करुन दिवसाढवळ्या अनेक नागरिकांना लुबाडण्याच्या घटना घडल्या आहेत.अशा प्रकारे वाढलेल्या प्रकारामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन शिरुर पोलीसांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.शिरुर शहरात बाजारपेठा, बॅंका, विविध महत्त्वाची ठिकाणे आहेत.या ठिकाणी तुम्ही काय काळजी घ्याल याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

काय काळजी घ्याल ? 
*बॅंका, एटिएम आदी ठिकाणी पैसे काढताना,ठेवताना काळजी घ्यावी.
*अनोळखी इसम जवळ आल्यास लगट करण्याचा प्रयत्न करत असेल तर आरडाओरडा करावा.
*संशयित व्यक्ती अथवा अनोळखी इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्यास पोलीसांना संपर्क साधावा.
*आपली गोपनीय माहिती इतरांना देउ नका.
*जास्त रक्कम जवळ बाळगताना विशेष काळजी घ्यावी.

तर अशा वेळी संपर्क कोणाला कराल ?

शिरुर पोलीस स्टेशन      : ०२१३८ २२२१३९
पोलीस उपनिरीक्षक घोंगडे  : ९८२२३३४४७५
पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे :९५९४९८९३०५
पोलीस नाईक संतोष कदम :७३५०६५३६५३ 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या