शिरुरचे डॉक्टर आंधळे दांपत्य गरीबांसाठी ठरत आहे देवदूत

शिरुर, ता.१६ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील ते डॉक्टर दांपत्य ख-या अर्थाने देवदुत बनले असून त्यांच्या या विशेष कार्याबद्दल त्यांचे सर्वञ विशेष कौतुक होत आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिरुर शहरात डॉ. सतीश आंधळे व अर्चना आधळे पाटील हे डॉक्टर दांपत्य शिरुर तालुक्यात स्ञी भ्रुणहत्या थांबावी या उदात्त हेतूने गेल्या वर्षभरापासुन कार्यरत आहेत. या डॉक्टर दांपत्याने वर्षभरापुर्वी मुलगी जन्माला आल्यास प्रसुती पुर्णपणे मोफत करत असुन रुग्णांकडुन या बदल्यात एक रुपयाही घेत नाही. या दांपत्याने गेल्या वर्षभरात एक रुपयाही न घेता आजतागायत अशा १५० मुलींच्या मोफत प्रसुती केल्या आहेत. या दांपत्यांच्या अनोख्या उपक्रमाची दखल या उपक्रमाचे प्रणेते डॉ. गणेश राख यांनी घेतली असुन नुकताच त्यांचा सन्मान डॉ.राख यांच्याहस्ते करण्यात आला.

शिरुर तालुक्यात डॉ. सतीश व अर्चना आंधळे यांनी हा उपक्रम शिरुर शहरात नव्हे तर संपुर्ण तालुक्यात राबविला असुन त्यांनी ख-या अर्थाने लेक वाचवा अभियानाला बळकटी दिली असुन या डॉक्टर दांपत्याचे संपुर्ण पुणे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या