दौंड शहरात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू

दौंड, ता.१६ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : दौंड येथे नगर मोरी चौक व बोरावके नगर परिसरात आज (दि.१६) रोजी भरदुपारी २  वाजण्याच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ३ जण जागीच ठार झाले असून या घटनेमुळे दौंड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला असून या हल्ल्यामागचे नेमके कारण समजु शकले नाही.या गोळीबारात अमोल जाधव, गोपाल शिंदे, प्रशांत पवार (सर्व रा. दौंड, जि. पुणे) असे झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर गोळीबार करणारा आरोपी हा दौंड येथील भारतीय रिझर्व्ह बटालियनमध्ये कार्यरत होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, संजय शिंदे याला सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांनी दौंड येथे दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सायंकाळी पावणेआठ वाजता शहरात येऊन घटनास्थळांची माहिती घेऊन तपासाचा आढावा घेतला.

संशयित शस्त्रागार विभागात कार्यरत

या प्रकरणातील संशयित मारेकरी सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय ब. शिंदे हा कोल्हापूर येथील इंडियन रिझर्व्ह बटालियनमध्ये नेमणुकीस असून, सध्या तो दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागार विभागात कार्यरत होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या