राज्य खो-खोसाठी धीरज दंडवते यांची प्रशिक्षक म्हणून निवड

वाघाळे, ता. 17 जानेवारी 2018: कोल्हापूर व इचलकंरजी येथे होणाऱया राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली माती क्रीडा प्रबोधीनीचे प्रशिक्षक धीरज दंडवते यांची पुणे जिल्हा किशोर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव व सचिव सचिन गोडबोले यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
गेल्या दोन वर्षांत दंडवते यांनी प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली 22 खेळाडूंनी 30 वेळा राज्यस्तरीय, 6 खेळाडूंनी राष्ट्रीय, 2 वेळा महाराष्ट्राचे कर्णधारपद,1 वेळा महाराष्ट्र राज्याचा सर्वौत्तम संरक्षक खेळाडू, एक वेळा अखिल भारत देशातील सर्वोत्कृष्ठ (किशोर गटातील) मानाचा ''भरत पुरस्कार" मिळाला आहे. भरत पुरस्कार हा पुणे जिल्ह्यातील पहिला व एकमेव आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन व सन्मिञ संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर गटाच्या जिल्हा अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा नुकत्याच पुणे (कोथरूड) येथे पार पडल्या. आपली माती क्रीडा प्रबोधीनी वाघाळे संघाने सलग 3 वेळा अंतिम सामन्यात प्रवेश करत उपविजेतेपद मिळवले. संघातील अमन बढे, विनायक शिंगाडे व प्रणव डेरे या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय संघामध्ये निवड झाली आहे

निवड झालेल्या सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, क्रीडा समितीचे सभापती महेंद्र आबा पठारे, उद्योगपती सोमातात्या सायकर व सचिव सचिन गोडबोले यांच्यासह परिसरातून अनेकांनी अभिनंदन केले आहे. शिवाय, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांकडून कौतूक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या