होमाचीवाडीतील रोहित्र जळण्याचे सत्र चालूच

दोन महिन्यात तीनदा रोहित्र जाळले; विजवितरण अपयशी
टाकळी भीमा, ता. 18 जानेवारी 2018 (एन. बी. मुल्ला):
शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा गावातील होमाचीवाडी येथील विद्युत रोहीत्राची गेल्या दोन महीन्यात तीन वेळा दुरुस्ती केली असताना पून्हा दहा दिवसांपासून नागरीकांना अंधारात राहावे लागत आहे. नवीन रोहीत्र येण्याच्या प्रतिक्षेत येथील नागरिक आहेत कायमचा तोडगा काढण्याची मागणी नागरिकांची होत आहे.
टाकळी भीमा येथील होमाचीवाडीतील मागील दोन महीन्यापुर्वीपासून तीनवेळा रोहीत्र जळाले होते, तेथील नागरिक प्रथम सतरा दिवस अंधारात होते नंतर दुसऱ्या वेळेला सात दिवस आणि आता दहा दिवस येथील नागरिकांवर पुन्हा अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या रोहीत्रावर जास्त भार झाल्यामुळे सतत जळण्याचे प्रमाण वाढलेली दिसत आहे याबाबत विजवितरण अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे वारंवार रोहित्र जळण्याचे कारण सापडत नसल्याने येथील नागरिक दोन महिने अंधारात राहिले आहेत.

होमाचीवाडी येथील रोहीत्र जळाले असून अद्याप ते नादुरुस्त अवस्थेत पडले असून येथील नागरिकांची गैरसोय झाल्याने नागरिक व शेतकरी वैतागले आहेत. याच विद्युत रोहित्रावरून होमाचीवाडी, पाचर्णेवस्ती येथेही विद्युत पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. तसेच शेतीला जोडधंदा दुग्धव्यवसाय असल्यामुळे जणावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असुन दुपत्या जनावरांना पाण्याची सोय नसल्याने याचा फटका दुध गवळ्यांना बसत आहे. तसेच याच विद्युत रोहित्रावरून शेतातील पिकांना सध्या शेतकऱ्यांना पाणी देता येत नसल्यामुळे पिक उत्पादनावर याचा मोठा परीणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा अर्थिक भुर्दंड बसणार आहे.

टाकळी भीमा गाव हे भीमा नदी किनारी असल्यामुळे सर्वभागात बागायत आहे सद्या शेतामध्ये रब्बी हंगामातील गहु, हरबरा, कांदा आदी नगदी पिके घेतली जात आहे. हि पिके जगवण्यासाठी पिकांना पाणी गरजेचे आहे सद्याच्या रोहीत्र बिघाडामुळे या नगदी पिकांच्या उत्पन्नावर फरक पडतो. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त पडला आहे. तर दुग्धव्यवसायीक मिळेल त्या मार्गाने पाणी आणून जनावरांना पुरवीत आहे असल्यामुळे तोही अर्थिक फटका बसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्यावर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तशेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना पाणी, पिकांना पाणी या सर्व गोष्टी विजेविना सध्यातरी अशक्यच आहे त्यामुळे शेतकर्यांसह येथील नागरिक विज येण्याच्या प्रतिक्षेत आहे.

गेली दहा दिवस वीज नसल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, वीजविभाग अजून किती दिवस नागरिकांना अंधारात ठेवणार असा सवाल नागरिक करत आहे, सध्या शेतामध्ये अनेकांची पिके जाळण्याची भीती येथील शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. येथील विजेचा कायमस्वरुपी सोडवण्यासाठी संबंधित विभागाने जळालेले रोहित्राची दुरुस्ती करुन येथे स्वतंत्र विज रोहीत्र बसवावी अशी मागणी येथील नागरिक वेळोवेळी करत आहे. परंतु विजवितरण विभागाचा ढिसाळ कारभार जनतेपुढे आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या