साडे सात हजार भाकरी अन् पंधरा पातेले रस्सा...

शिरुर, ता.२३ जानेवारी २०१८ दिनांक (सतीश केदारी) :साडे सात हजार भाकरी अन पंधरा ते वीस पातेले रस्सा सोबत लाफशी असं अनोख्या महाप्रसादाचं आयोजन शिरुर येथे अनुभवायला मिळालं.
गणेशजयंतीनिमित्त येथिल हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हे मागील अनेक वर्षापासून महाप्रसादाचे आयोजन करित असते मागील वर्षी गणेश जयंतीनिमित्त मंडळाने सुमारे चार हजार भाविकांसाठी पुरणपोळी व आमटीचा महाप्रसाद केला होता.

गणेशजयंतीनिमित्त हलवाई गणेश मंदिरावर विद्युत रोषणाई  करण्यात आली होती सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. गणेश जयंती होमहवन व सामूहिक आरती करण्यात आली यावेळी भाविकांसाठी मांसवडी रस्सा व बाजरीची भाकरी अश्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.चूलीवरच्या भाकरी व मांसवडी व  रस्सा,लापशी  या महाप्रसादाचा  आस्वाद घेण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती.या अनोख्या महाप्रसादासाठी सकाळपासुन २५-३० महिलांनी चुलीवर भाकरी तयार केल्या.तर या वेळी सुमारे साडेसातहजारांहुन अधिक भाकरी करण्यात आल्या.२५० किलोहुन अधिक मासवड्या बनविण्यात आल्या होत्या.त्याचप्रमाणे दोनशे  किलोचा भातही तयार करण्यात आला तर १५-२० पातेले रस्सा बनविण्यात आला होता.
या वेळी सुमारे पाच हजारांहुन अधिक नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती प्रा.सतीश धुमाळ यांनी दिली. 

या कार्यक्रमाला आमदार बाबूराव पाचर्णे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर उज्जवला बरमेचा,सुवर्णा लोळगे,रवींद्र ढोबळे नगरसेविका मनिषा कालेवार,संदिप गायकवाड, माजी नगरसेवक सुनिल बाफणा, भाजपाचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,माजी उपनगराध्यक्ष सुरेश बोरा,ललित नहार,ॲक्टिव्ह गृप चा सुनिता बाफना,आदिशक्ती महिला संघटनेच्या शशिकला काळे,भीमाशंकर प्रिटिंग क्लस्टरचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदिप बारवकर, अनिल बांडे,रवींद्र खांडरे,विनय संघवी ,यासह राजकिय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हलवाई गणेशाचे दर्शन घेतले.

नवसाला पावणारा अशी ख्याती हलवाई गणेशाची आहे. सर्वधर्मिय कार्यकर्त्याच्या राबता असणारे  हे मंडळ सतत विविध सामाजिक व धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. मागील वर्षी विसर्जन मिरवणूकीचा खर्च टाळून व साध्या पध्दतीने मिरवणूक काढून मंडळाने वाचलेल्या पैशांतुन हलवाई चौक परिसरात आठ सी सी टी व्ही कॅमेरे बसविले होते. तर यंदाचा वर्षी ही ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराज या देखावा सादर करुन शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ल्याची माहिती व चित्रे तयार केली होती. गणेशोत्सव नंतर किल्ल्याची सर्व चित्रे व माहिती फलक जिल्हा परिषद व नगरपलिकेच्या शाळाना भेट म्हणून मंडळाने दिली होती.या शिवाय शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले होते. आरोग्य जनजागरण विषयक रॅली ही मंडळाने काढली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या