पैलवानांच्या बहारदार खेळाने फेडले डोळयाचे पारणे (Video)

करडे, ता.२३ जानेवारी २०१८(सतीश केदारी) : शिरुर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेत अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळयाचे पारणे फेडले.

करडे(ता.शिरुर) येथे भरविण्यात आलेल्या शिरुर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेत रविवार(दि.२१) रोजी मल्लांची वजने घेण्यात आली तर काल(ता.२२) रोजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंगसर यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.सकाळच्या सञात चिमकुल्या मल्लांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर सायंकाळच्या सञात जिल्ह्यातुन आलेल्या मल्लांनी बहारदार खेळाने डोळयाची पारणे फेडली.खुला गट व इतर सर्व गटात प्रत्येकी तीन तीन राउंड खेळविण्यात आले.सकाळ व सायंकाळच्या सञात दोन्ही मिळुन सुमारे ११२ कुस्त्या पार पडल्याची माहिती कुस्तीगीर संघटनेचे तालुकाकार्याध्यक्ष झेंडु पवार सर यांनी दिली.दोन्ही सञात होणा-या कुस्त्यांवर कुस्ती निरीक्षक मेघराज कटके, जिल्हा उपाध्यक्ष रामभाउ सासवडे हे विशेष लक्ष ठेवुन आहे.

सायंकाळी उशिरा उद्योजक प्रकाश धारिवाल, सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक अभिजित पाचर्णे, संजय देशमुख यांनी भेट दिली. आज होणा-या कुस्ती स्पर्धेत कोण होणार शिरुर मल्लसम्राट याची सर्वांना उत्सुकता लागुन राहिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या