गणेगाव मॅरेथॉनला येणार महाराष्ट्र केसरी अभिजित कटके

गणेगाव खालसा, ता.२४ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : महाराष्ट्र केसरी अभिजित कटके अन भारतीय कबड्डी संघाचा कॅप्टन अनुप कुमार यांसह दिग्गज मान्यवर गणेगाव महामॅरेथॉन २०१८ ला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
गणेगाव खालसा येथे फ्री रनर्स चॅरीटेबल ट्रस्ट व गणेगाव रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महामॅरेथॉन ला नुकताच वयाच्या बावीसाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेला अभिजित कटके तसेच भारतीय कबड्डी संघाचा कॅप्टन अनुप कुमार हे उपस्थित राहणार आहेत.बोनस का बादशाह या नावाने संबोधल्या जाणा-या अनुप कुमार यांना भारत सरकारच्या वतीने 'अर्जुन'पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याचबरोबर महाराष्ट्र संघाचा कबड्डी संघाचा खेळाडु महेंद्र रजपुत हे देखिल उपस्थित राहणार आहेत.महेंद्र रजपुत हे स्वत: पोलीस सेवेत असुन महाराष्ट्र पोलीस संघाकडुन प्रो कबड्डी स्पर्धेत अफलातुन कामगिरी केली आहे.

शिरुर तालुक्यात भरवलेल्या महामॅरेथॉन ला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या