रामलिंगच्या सुपुञाचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

शिरुर,ता.२५ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : रामलिंग येथील संपत महादेव जाधव यांचा उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल राज्याचे राज्यपाल विदयासागर राव यांच्या हस्ते विशेष पदक देउन सन्मान करण्यात आला.

मुळचे रामलिंग(शिरुर ग्रामीण) येथील संपत महादेव जाधव हे पुणे शहर वाहतुक शाखेत सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत आहेत.जाधव यांनी पोलीस सेवेत विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना उत्कृष्ट सेवा केली.त्यांच्या या कार्याची दखल घेउन त्यांना राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले होते.त्यानुसार (दि.१६) रोजी यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान, नरिमन पोईंट मुंबई येथे राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

पोलीस अधिकारी संपत जाधव यांच्या या सन्मानाबद्दल शिरुर व रामलिंग परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या