करडेच्या सरपंच कविता जगदाळेंना 'आदर्श सरपंच' पुरस्कार

करडे, ता. २७ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : दु्ष्काळी गावाची ओळख पुसुन पाणीदार गावासाठी झटणा-या करडेच्या सरपंच कविता जगदाळे(पाटील) यांना माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते नुकताच आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
करडे गाव हे एकेकाळी अत्यंत दुष्काळी समजले जात होते.परंतु माजी सरपंच कविता जगदाळे यांनी त्यांच्या कार्यकालात विविध शासकिय योजना राबविल्या.जलयुक्त शिवार मोहिम गावात प्रभावीपने राबवुन गावाची दु्ष्काळी ओळख कायमचीच पुसुन टाकली.गावात विविध योजना राबविल्या गेल्या.त्यांच्या याच कार्याची दखल घेउन त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहिर झाला होता.

आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते  देण्यात आला.या वेळी जि.प.अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, माजी उपसरपंच गणेश रोडे, संतोष घायतडक, ग्रामसेवक राहुल बांदल, जितेंद्र काळे, आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या