गणेगावमध्ये आज मॅराथॉन एक्स्पो; टी-शर्टचे वाटप सुरू

गणेगाव खालसा, ता. 27 जानेवारी 2018 (सतीश केदारी): गणेगाव हाल्फ मॅराथॉन साठी आज (शनिवार) सकाळी १० ते ४ या वेळेत मॅराथॉन एक्स्पो ठेवण्यात आलेला आहे. यावळी रजिस्ट्रेशन केलेल्या खेळाडूंना टी-शर्ट, बिब्सचे वाटप व रुटची माहिती एक्स्पो मध्ये दिली जाणार आहे. शिवाय, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामार्फत पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.
मॅराथॉन एक्स्पो बाबत माहिती
1) गणेगाव हाल्फ मॅराथॉनसाठी आज (२७ जानेवारी) सकाळी १० ते ४ या वेळेत मॅराथॉन एक्स्पो ठेवण्यात आलेला आहे.
2) ज्यांनी रेजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांचे टी-शर्ट व बिब्सचे वाटप व रुट ची माहिती एक्स्पो मध्ये दिली जाणार आहे.
3) त्यासाठी रेजिस्ट्रेशन केल्याबाबतचा ऑनलाइन मेसेज/ ई-मेल व ओळखपत्र आवश्यक आहे.
4) मित्र किंवा नातेवाईकाचे टी -शर्ट, बिब्स घेण्यासाठी त्याचे संमतीपत्र व ओळखपत्राची झेरॉक्स आवश्यक आहे.
     
स्पॉट रेजिस्ट्रेशन्स बाबत:
ज्या धावपटूंना स्पॉट रजिस्ट्रेशन्स करावयाचे आहे, त्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मर्यादित स्पॉट रजिस्ट्रेशन्स उपलब्ध सुरू आहे.
 
आज (शनिवार) सकाळी १० ते ४ या वेळेत एक्स्पो ठेवण्यात आलेला आहे. या एक्स्पो मध्ये खालील उपक्रम समाविष्ट आहेत.

   • खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामार्फत पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन
   • तहसीलदार कार्यालय शिरूर तर्फे आधार नोंदणी सुविधा
   • पंचायत समिती शिरूर तर्फे मुलींची हिमोग्लोबीन तपासणी व इतर शासकीय योजनांची माहिती   
   • युनिक अकॅडमि पुणे तर्फे MPSC / UPSC  परीक्षांबाबत मार्गदर्शन व पुस्तक प्रदर्शन
   • मेडिसिन फ्री life NGO  तर्फे मार्गदर्शन
   • गणेगावतील महिला बचत गटातर्फे बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

स्थळः
गणेगाव-रांजणगाव गणपती रस्त्यावर.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या