बहारदार कार्यक्रमांनी आणली मिलाप कार्यक्रमाला रंगत

नांदेड,ता.२९ जानेवारी २०१८(सतीश केदारी) : कविता..गजला अन विविध बहरदार कार्यक्रमांनी ज्ञानपीठ फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.याकार्यक्रमाला राज्यभरातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली.
ज्ञानपीठ फौंडेशनचा प्रथम वर्धापनदिन नांदेड येथील पिपल्स कॉलेज मधील नरहर कुरुंदकर सभागृहात पार पडला.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. गुलाब वृक्षाला पाणी घालुन व प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी(नांदेड),प्रसिद्ध गजलकार रत्नाकर जोशी(जिंतुर),ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.जगदीश कदम,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समिक्षक प्रा.महादेव रोकडे(पुणे),प्रसिद्ध गजलकार बदिउज्मा बिराजदार(सोलापुर),प्रसिद्ध गजलकार आत्माराम जाधव(राणी सावरगाव), कवयिञी कांचन वीर,अनुराधा हवेलीकर,कुमार अभंगे, किर्ती हरिभक्त आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.या वेळी राज्यभरातुन आलेल्या साहित्यिकांचा गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला. दोन सञात मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानपीठ फौंडेशनचे अध्यक्ष कुमार अभंगे  यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी देविदास फुलारी, जगदीश कदम,प्रा.महादेव रोकडे आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्य प्रतिभा गौरव पुरस्कार गजलकार विजय वडवेराव यांना तर प्रेरणा पुरस्कार कवी बालाजी पेटेकर, निशांत पवार, सिंधूताई दहिफळे, प्रज्ञा शिंदे, विष्णू जगळपुरे, श्रावणी दवणे यांना देण्यात आला.त्याचप्रमाणे ज्ञानपीठ फौंडेशन ने आयोजित केलेली मिलाप काव्यस्पर्धेचा बक्षिस वितरण सभारंभही पार पडला.यातील विजेत्यांना ट्रॉफी अन प्रमाणपञ देण्यात आले.माया तळणकर यांच्या काव्यस्पर्श या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्याचप्रमाने पांडुरंग कोकुलवार यांच्या चिञफितीचे प्रकाशन करण्यात आले.अरविंद शेलार यांच्या चिञांचे प्रदर्शन या निमित्ताने भरविण्यात आले होते. तर ज्ञानपीठ फौंडेशन ची काढण्यात आलेली रांगोळी सर्वांची लक्ष वेधुन घेत होती.

या कार्यक्रमात कवी विजय वडवेराव यांनी तु वाड्यातील सुंदर मुर्ती..मी वेशीवरचा दगड ही गजल, साबीर सोलापुरी यांनी आई वर तर अनेक कवींनी बहारदार कवीता  सादर केल्या. या सर्व कवींनी सादर केलेल्या कविता व गजलांना उपस्थितांनी टाळ्या वाजवुन दाद दिली.

या कार्यक्रमाचे सुञसंचालन अरविंद सगर यांनी केले.तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानपीठ फौंडेशनच्या संचालिका  अनुराधा हवेलीकर, किर्ती हरिभक्त, स्वागताध्यक्ष डॉ.श्याम पाटील तेलंग यांच्यासह सुनिल बदकलु,प्रमोद  ओपळकर, मैञी विवाह मिञ मंडळ(नांदेड) प्रा.महेश मोरे, प्रा.शंकर विभूते, दीपक सपकाळे, व्यंकटेश काटकर, शिवाजी होळकर,प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, बालाजी पोगुलवाड, अनिल बलखंडे, रघुनाथ पोतरे, संदीप भुरे, भारत कांबळे, सुनील पाटील, प्रणव बोडके, गजानन सावंत, अमित पवार, लखन कावळे यांच्यासह अनेकजणांनी विशेष परिश्रम घेतले.

ज्ञानपीठ फौंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमास राज्यभरातील कवी-कवयिञी, साहित्यिक, लेखक व सर्व क्षेञातील मान्यवरांनी हजेरी लावली.


नांदेड,ता.२७ जानेवारी २०१८(सतीश केदारी) :  ज्ञानपीठ फाउंडेशनच्या आयोजित केलेल्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिलाप कार्यक्रमाला राज्यभरातुन साहित्यिक येणार असुन याच कार्यक्रमात   राज्यस्तरीय साहित्य प्रतिभा गौरव पुरस्कार गजलकार विजय वडवेराव तर प्रेरणा पुरस्कार कवी बालाजी पेटेकर, निशांत पवार, सिंधूताई दहिफळे, प्रज्ञा शिंदे, विष्णू जगळपुरे, श्रावणी दवणे यांना देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कुमार अभंगे, अनुराधा हवेलीकर यांनी दिली आहे.

ज्ञानपीठ फाउंडेशन च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नांदेड येथील साहित्यनगरीत नरहरी कुरुंदकर सभागृहात मिलाप कार्यक्रम पार पडत आहे. या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि गझलकारांचा कविता गजलांची सुरेल मैफल हा कार्यक्रम होणार आहे.
प्रा. महादेव रोकडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नुकतीच निवड जाहीर केली होती. सुप्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांनी या पुरस्काराची घोषणा केली.त्यानुसार राज्यस्तरीय साहित्य प्रतिभा गौरव पुरस्कार गजलकार विजय वडवेराव तर प्रेरणा पुरस्कार कवी बालाजी पेटेकर, निशांत पवार, सिंधूताई दहिफळे, प्रज्ञा शिंदे, विष्णू जगळपुरे, श्रावणी दवणे यांना देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी अर्चना डावरे, आशा डांगे, ज्योती सोनवणे, कांचन वीर, पुष्पा पाटील, बालाजी पेटेकर, अमृत तेलंग, श्रीनिवास म्हस्के, निशांत पवार, प्रज्ञा आपेगावकर, साविञी दमकोंडवार, अरविंद शेलार, नरेंद्र धोंगडे, उषाताई ठाकुर, आकांक्षा आळणे, सचिन चौकसकर, व्यंकटेश काटकर, विलास हनवते, सुमेध घुगरे, सुमेध कांबळे, संदिप भुरे, शंकर राठोड, पुजा मेटे, आत्माराम जाधव, रत्नाकर जोशी, बदिउज्मा बिराजदार, अनिकेत कुलकर्णी, स्वाती कान्हेगावकर, विनिता पाटील, शैलजा कारंडे, नयन राजमाने, गिता  पांपटवार, ज्योती गायकवाड, प्रकाश वानखेडे आदींसह राज्यभरातुन मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थित म्हणुन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.जगदीश कदम, प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारे(नांदेड), लेखक महादेव रोकडे(पुणे), प्रसिद्ध गजलकार बदिउज्मा बिराजदार(सोलापुर),कवयिञी अर्चना डावरे, ख्यातनाम समिक्षक संजय बोरुडे(नगर), प्रसिद्ध गजलकार अरविंद सगर(परभणी), प्रसिद्ध गजलकार आत्माराम जाधव(राणी सावरगाव),प्रसिद्ध गजलकार रत्नाकर जोशी(जिंतुर), कवयिञी आशा डांगे(औरंगाबाद), कवयिञी ज्योती सोनवणे, कवयिञी कांचन वीर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मिलाप कार्यक्रमास राज्यभरातुन साहित्यिक उपस्थित राहणार असल्याने  जास्तीत जास्त काव्य प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक कुमार अभंगे, अनुराधा हवेलीकर, किर्ती हरिभक्त, प्रवीण भाकरे, स्वागताध्यक्ष डॉ.श्याम पाटील तेलंग यांनी केले आहे.

तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.महेश मोरे, प्रा.शंकर विभूते, दीपक सपकाळे, व्यंकटेश काटकर, शिवाजी होळकर,प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, बालाजी पोगुलवाड, अनिल बलखंडे, रघुनाथ पोतरे, संदीप भुरे, भारत कांबळे, सुनील पाटील, प्रणव बोडके, गजानन सावंत, अमित पवार, लखन कावळे यांच्यासह अनेकजण परिश्रम घेत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या