प्रकाश धारिवाल चषकाचा रांजणगाव इलेव्हन मानकरी

शिरूर,ता.२९ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : माजी नगराध्यक्ष  रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित मा .नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक क्रिकेट स्पर्धेत  प्रथम क्रमांक रांजणगाव गणपती इलेव्हन शिरूर प्रिमियर लीग चा मानकरी ठरला आहे.तर राकेश जगताप सुवर्णामुद्रा वॉरियर्स  द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
शिरूर येथे नगरसेवक रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित माजी नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, आयपीएल खेळाडू राहुल त्रिपाठी, उद्योगपती आदित्य धारीवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल, माजी आमदार पोपटराव गावडे,आदित्य धारीवाल, बाजारसमिती सभापती शशिकांत दसगुडे,शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख नीलेश लंके,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,स्पर्धेचे आयोजक रविंद्र ढोबळे,स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे, चेतन कुरुंदळे, हभप किरण महाराज भागवत, नगरसेवक संजय देशमुख, मुजफ्फर कुरेशी, अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार नितीन पाचर्णे, संदीप गायकवाड, बाजार समिती संचालक बाबासाहेब सासवडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा,बादशहाभाई मण्यार ,प्रविण दसगुडे ,दादाभाऊ वाखारे,राजेंद्र ढोबळे,शिक्षण मंडळ सदस्य तुकाराम खोले,विद्याधाम प्राशालेचे गोरक्ष दळवी,श्रीकांत पाचुंदकर, जयसिंग धोत्रे,निलेश कोळपकर, अमजद सौदागर, किरण आंबेकर,सनी दळवी,संतोष शिंतोळे,गुलाम पठाण, फिरोजभाई बागवान, सागर ढवळे, दत्ता पवार, राहुल पवार,रविंद्र जाधव, पंच दगडू त्रीमुखे,पोपट चव्हाण, शफीकभाई शेख व मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

या स्पर्धेचा अंतिम सामना  रंगला हा सामना पहाण्यास शिरूर शहर व तालुक्यांतून दहा हजार प्रेक्षक उपस्थित होते तर या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला आयपीएल खेळाडू राहुल त्रिपाठी उपस्थित नागरिकांची त्याने मने जिंकली.

यास्पर्धेत प्रथम क्रमांक एक्कावन हजार रुपये चा मानकरी ठरला तोरांजणगाव गणपती इलेव्हन नानासाहेब लांडे, बापू लांडे   ,द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये चा मानकरी राकेश जगताप सुवर्णमुद्रा वॉरियर्स शिरूर ,तिसरा क्रमांक एकतीस हजार रुपये मानकरी ठरला नामदेव पडवळ आळेफाटा संघ, चतुर्थ क्रमांकाचा एकवीस हजार रुपये चा मानकरी ठरला कुंजिरवाडी संघ  शिरूर    यांनी मिळवला यावेळी सर्व विजेते संघांना शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष कै केशरसिंग खुशालसिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास केशरसिंग परदेशी यांच्या वतीने आकर्षक  स्म्रुति चिन्ह रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले.तर मॅन ऑफ द सीरिज़ करिता स्प्लेडर मोटर सायकल ठेवण्यात आली होती त्याचा मानकरी गणेश जाधव  हा ठरला आहे.तर बेस्ट बॉलर बंटी पोटघन,बेस्ट विकेट कीपर निलेश भापकर शिरूर,बेस्ट फलंदाज वसीम शेख शिरूर यांनी किताब मिळवला.स्पर्धेतील उत्कृष्ट झेल हसन मदारी, सलग तीन षटकार बबलू पाटील रांजणगाव, सलग तीन चौकार समीर जाधव पोलिस इलेव्हन, सलग तीन व्हिकेट आसिफ शेख रांजणगाव या सर्व विजेत्यांना रौलेक्स घड्याळ, टी शर्ट,मोबाईल, शूज देऊन गौरवण्यात आले.यावेळी बोलताना उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल म्हाणले की शिरूर मध्ये राहुल त्रिपाठी सारखा एक उदयन्मूख खेळाडू येऊन येथील क्रिकेट प्रेमींना मार्गदर्शन करून त्यांच्या उत्साह वाढवतो हे शिरूर करिता गौरवास्पद असल्याचे सांगितले.जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कद म्हणाले की शिरूर तालुक्यात होणारा उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल चषक करंडक स्पर्धा हिं शिरूर तालुक्यातील खेळाडू साठी प्रोत्साहन देणारी स्पर्धा असून आयोजक माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, प्रशांत शिंदे यांचे कौतुक करावे येवढी मोठी स्पर्धा त्यांनी भरवली आहे.

पुणे, मुंबई शहराला लाजवेल एवढे छान नियोजन करून शिरूर शहराचा नावलौकिक वाढवण्याचे काम आयोजकांनी केले असल्याचे बाजार समिती संचालक शशिकांत दसगुडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या