गणेगाव मॅरेथॉनला राज्यभरातून धावपटूंची गर्दी (Video)

गणेगाव खालसा,ता.३० जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : गणेगाव खालसा येथे पार पडलेल्या गणेगाव हाफ मॅरेथॉन मध्ये राज्यभरातील हजारो धावपटूंनी गर्दी केली होती.
गणेगाव खालसा(ता.शिरुर) येथे पुणे जिल्हयात प्रथमच ग्रामीण भागात फ्री रनर चॅरीटेबल ट्रस्ट पुणे व गणेगांव रनर्स, कोझी कॉर्नर शिक्रापुर यांच्या संयुक्त विद्यमाने  हाफ मॅरॅथॉन 2018  महा मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन साठी राज्यभरातील धावपटुंनी सहभाग घेतला होता. आयोजित करण्यात आलेल्या या महा मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यासह राज्यभरातील हजारो स्पर्धक धावले. स्पर्धेत १५० शिक्षक, ५० डॉक्टर, ३० उच्च दर्जाचे अधिकारी व ६० टक्के विद्यार्थी व ४० टक्के महिलांनीही सहभाग घेतला. खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ७५ महिला पोलीस अधिकारी यांनी सहभाग घेतला. तालुक्यातुन महिला, मुलींची संख्या लक्षणीय होती.कोल्हापुर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई आदी विविध भागातुन अनेक धावपटु हे मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.या स्पर्धेत ७ वर्षाच्या मुलींपासुन ते ७५ वर्षांच्या आजी धावताना दिसत होत्या.शिस्तबद्ध वातावरणात हि स्पर्धा पार पडली.या झालेल्या स्पर्धेत खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या महिलांनी बाजी मारत पदके जिंकली.

ग्रामीण भागात पार पडलेल्या या मॅरेथॉन मध्ये सुमारे ३ हजार धावपटुंनी भाग घेतला.या कार्यक्रमासाठी वयाच्या २२ वर्षी महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलेल्या अभिजित कटके यांची व भारतीय कबड्डी संघातील स्टार खेळाडु नितीन मदने प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेली उपस्थिती तरुणांना उर्जादायक ठरली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या