'सामुदायिक विवाह चळवळीसाठी एकत्रित प्रयत्न करावेत'

शिरूर, ता. 31 जानेवारी 2018 (प्रतिनिधी): सामुदायिक विवाह चळवळ आधिक गतीने पुढे नेण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन अल मदद बैतुल माल कमिटी शिरुरचे अध्यक्ष फिरोज बागवान यांनी केले.


माजी नगराध्यक्ष शहिदखान पठाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन कमिटीचा वतीने करण्यात येते. यंदाच्या वर्षीही या सामुदायिक सोहळ्यात ५ विवाह नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य जाकिरखान पठाण यांनी केले त्यात त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता व्यक्त करुन लग्नात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देणे आवश्यक आहे. नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, नगरसेवक नितीन पाचर्णे, प्रा सतिश धुमाळ यांनी शुभेच्छा दिल्या .

बागवान म्हणाले, सामुदायिक विवाह चळवळ ही गरजेची बनली आहे, याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वानी पुढाकार घेणे आवश्यक आहे. १५ वर्षापुर्वी शहरात सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली असून, अनेक जण हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, शिरुर जमातीचे अध्यक्ष इक्क्बालभाई सौदागर, माजी नगरसेवक अबिदभाई शेख, प्रिंटिंग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, माजी सभापती तुकाराम खोले, माजी सभापती निलेश खाबिया, रिक्षा पंचायतीक्गे अनिल बांडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे केंद्र संयोजक प्रा. चंद्रकांत धापटे, युनुस तांबोळी, अविनाश मल्लाव, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय बारवकर व बाळासाहेब ओस्तवाल यांनी केले. आभार आरिफ सय्यद यांनी मानले.

या कार्यक्रमात सामुदायिक विवाह चळवळ शहरात १५ वर्षापासून राबविण्यासाठी पुढाकार घेणारे फिरोज बागवान यांच्या हलवाई चौक गणेश मंडळ यांच्या वतीने सत्कार जाकिरखान पठाण सिंकदर मण्यार व प्रा सतिश धुमाळ यांनी केला.

सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्याकरिता शब्बीर बागवान, साबीर शेख, सिंकदर खान, नसिम काझी, रियाज खान, अन्वर खान, तन्वीर खान, बादशाह मण्यार, सिंकदर मण्यार, मोनिब शेख, फैय्याज सौदागर, बदृदिद्न काझी, जलिल पठाण हैदर शेख, लालु शेख, रफिक शेख, इरफान खान, शाहेद सौदागर आदीनी प्रयत्न केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या