सादलगाव येथील तरुणाचा अपघाती मृत्यू ?

सादलगाव,ता.३१ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : येथील तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवार(ता.३०) रोजी राञी घडली.या घटनेप्रकरणी विजय नामदेव जगताप यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

या घटनेत संजय नामदेव जगताप असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन वामन गायकवाड, सिद्धार्थ सुरेश जगताप, अमोल श्रीहरी शिंदे, विनोद ज्ञानदेव ससाणे यांच्या सह फिर्यादीचे बंधु संजय हे सादलगाव येथील तुकाराम दादासाहेब पवार यांच्या ट्रॅक्टरवर कामाला गेला होता.ट्रॅक्टर चालक म्हणुन हरिदास विष्णु शितोळे हा ट्रॅक्टर चालवत होता.हे सर्वजन ट्रॅक्टर मध्ये बसुन राञीच्या सुमारास सादलगाव ते कानगाव रोडने ट्रॅक्टरवर भरधाव वेगाने जात होते.दरम्यान ट्रॅक्टर ने उसळी मारल्याने संजय हा ट्रॅक्टर मधुन खाली पडला.त्याला छातीला मार लागल्याने तातडीने दवाखान्यात दाखल करन्यात आले परंतु उपचारापुर्वीच त्याचे निधन झाले. हा अपघात राञी सव्वा नउच्या सुमारास घडला.या घटनेप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहे.

दरम्यान या घटनेने सादलगावात खळबळ उडाली असुन घटना नेमकी कशी घडली याबाबत चर्चांना उधान आले असुन आज (दि.३१) रोजी शोकाकुल वातावरणात संजय याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतक्या राञी थंडीतही हे सर्वजण नेमक्या कोणत्या कामाला चालले होते याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या