सेल्फीची क्रेझ अन झिंगाटवर थिरकली तरुणाई...

गणेगाव खालसा, ता.३१ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : गणेगाव खालसा येथील हाफ मॅरेथॉन मध्ये भल्या पहाटे झिंगाट च्या तालावर डान्स करताना अन संपुर्ण स्पर्धेत सेल्फीची भन्नाट क्रेझ पहायला मिळाली.

गणेगाव खालसा येथे पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रथमच भव्य अन दिव्य अशा पद्धतीने फ्री रनर्स चेरीटेबल ट्रस्ट पुणे, गणेगाव रनर्स व कोझी कॉर्नर शिक्रापूर यांच्या वतीने गनेगाव हाफ मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन मध्ये ५, १०, २१ किमी साठी धावण्यासाठी राज्यभरासह देश-विदेशातील खेळाडुंनी सहभाग घेतला होता. पहाटे ५ वाजुन ३० मिनिटांनी सुरु झालेल्या मॅरेथॉनची सुरुवात झेंडा दाखवुन करण्यात आली होती.या मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी वॉर्म अप करण्यासाठी वेगवेगळ्या संगीताच्या तालावर गाणी लावलेली होती.या वेळी झिंगाट अन पॉप म्युझिक चा अनेक आनंद घेत होते.त्याचप्रमाणे वॉर्म अपही करत होते.गणेगाव मधील मॅरेथॉन एक स्पर्धा जरी असली तरी यात स्पर्धा असल्यासारखे वातावरण कोठेच पहायला मिळाले नाही तर प्रत्येकजण या स्पर्धेचा भल्या पहाटेपासुन आनंद घेत होते.स्पर्धा सुरुवात झाल्यापासुन ते स्पर्धा संपेपर्यंत जो-तो स्मार्ट फोन वर ग्रुप चे तसेच स्वत:चे सेल्फी काढत असल्याचे चिञ पहायला भेटत होते.

प्रत्येकजण या मोठ्या इव्हेंटचा आनंद घेत होते.अनेकांनी संकेतस्थळाशी बोलताना उत्कृष्ट अन शिस्तबद्ध नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामीण भागात आयोजित स्पर्धा शहरात असल्याचाच फिल येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या