कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी ४० जणांना अटक

कोरेगाव भीमा, ता.१ फेब्रुवारी २०१ (प्रतिनीधी) : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी बुधवारी (दि. ३१) सणसवाडी व शिक्रापूर येथून चाळीस जणांना अटक केली.यानंतर शिरुर न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.कोरेगाव भीमा तसेच सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी दंगल झाली होती. या दंगलीमध्ये शेकडो वाहनांची तोडफोड, जाळपोळ, दुकानांचे, तसेच घरांचे नुकसान झाले होते. या घटनेमध्ये सरकारी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सणसवाडी, कोरेगाव भीमा या भागातील अनेक नागरिक गायब झाले होते. परंतु, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींच्या नावांचा शोध सुरू केला. त्यातून पोलिसांनी आरोपींची नावे उपलब्ध करून ३२ आरोपींना अटक केली.दरम्यान बुधवारी (दि. ३१) सकाळी सणसवाडी येथील तब्बल ३२ जण, तर कोरेगाव भीमा येथील आठजण असे एकूण ४० जण शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना शिरूर न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

यापूर्वी दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये स्थानिकांसह बाहेरील नागरिकांचाही समावेश आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या