शिरुरला शास्त्रीय गायन वादन स्पर्धा संपन्न

शिरूर, ता. १ जानेवारी २०१८ (प्रा.संदीप घावटे) : जागतिक कीर्तीचे तबला नवाज उस्ताद निजामुद्दीन खाँ यांचे स्मरणार्थ शिरूर येथील सुर-ताल संगीत विदयालयाच्या वतीने शास्त्रीय गायन-वादन स्पर्धेचे आयोजन नुकतेच शिरूर येथे करण्यात आले होते.


या स्पर्धा गुरुवर्य आर. एन. भनगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.सूर-ताल विद्यालयाचे संचालक महेंद्र पळसकर व मंगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे शिक्षण शेकडो विद्यार्थी घेत आहेत.त्यांनी प्रथमच शिरूर येथे या स्पर्धा आयोजित केल्या.या स्पर्धेचे उद्घाटन  घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते झाले.

शिरूर तालुक्यातील संगीत विद्यालयाच्या या उपक्रमाला शुभेच्छा देताना त्यांनी "आजच्या युगात जीवनातील संगीताचे  महत्त्व   याचे मार्गदर्शन केले.तबला वादन स्पर्धेमध्ये सौरभ दंडवते प्रथम क्रमांक,सुदर्शन खोडदे द्वितीय क्रमांक तर निनाद पांढरे तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ पारितोषिक कुणाल जाधव याला मिळाला.तसेच शास्त्रीय गायन स्पर्धेमध्ये गायत्री शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक स्वराली जाधव तृतीय क्रमांक देवयानी झरेकर तर उत्तेजनार्थ पारितोषिक संस्कार मंडळकर याने मिळवला.

सर्व विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली.या कार्यक्रमाला शिरूर नगरपालिका नगरसेवक नितीन पाचर्णे,  राज्याचे शाहीर संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर सुपेकर,डॉ. संतोष पोटे,पुष्कर ज्वेलर्स चे प्रशांत लोळगे, श्रीहरी मेंदरकर, प्रा. केशव गाडेकर, अच्युत सुतार सर,डॉ.विशाल सुपेकर,सुहास मस्किकर, विठ्ठल पडवळ सर,दंडवते गुरुजी,माऊली,रमेश रोहकले हे मान्यवर तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचे परिक्षक म्हणून सतीश काळे व प्रकाश पवार यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गायकवाड यांनी केले.तर आभार संदीप वेताळ यांनी मानले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन सूरताल विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या