'प्रहार'च्या वतीने रक्तदान शिबिरात 100 बाटल्या रक्त संकलित (Vdo)

निमोणे, ता. 2 फेब्रुवारी 2018 (तेजस फडके): २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिरुर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०० बाटल्या रक्त संकलित झाले. निमोणे, शिंदोडी, मोटेवाडी परिसरातून जेष्ठ नागरीक व युवकांनी मोठया प्रमाणात रक्तदान केले."आजच्या युवकांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घ्यावा, परंतु गावच्या विकासासाठी व सामाजिक कामासाठी सगळे पक्ष व संघटना सोडून एकत्र येऊन पुढे चला, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी येथे केले.


यावेळी आनंदऋषी ब्लॅड बँकेचे डॉ सागर धायगुडे, डॉ संदीप भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी, सरपंच उर्मिला काळे, उपसरपंच प्रवीण दोरगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक काळे, शिरुर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शेतकरी संघटनेचे भरत काळे, अंकुशराव जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष काळे, माजी सरपंच विजय भोस, पांडुरंग दुर्गे, जिजाताई दुर्गे, श्रीधर साळुंके, युवा कार्यकर्ते दत्ता जाधव,योगेश काळे,मयुर ओस्तवाल, सागर काळे, भरत हिंगे, योगेश काळे, बिभीषण गायकवाड व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या