शिंदोडी येथील शाळेस शालोपयोगी साहित्य भेट (Video)

शिंदोडी, ता. 3 फेब्रुवारी 2018 (तेजस फडके): पुणे येथील उर्मी संस्था तसेच मुळशी येथील एस.एस.वाय.संस्थेच्या वतीने शिंदोडी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शालोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. उर्मी संस्थेचे सेक्रेटरी श्री. राहुल शेंडे यांनी शाळेस नुकतीच भेट देऊन दोन लॅपटॉप भेट दिले. तसेच यापुढील काळात शाळा दत्तक घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शाळेस लागणारे आणखी २५ संगणक तसेच इमारतीपासून ते सर्व गुणवत्तावाढी संदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शाळेस अनेक भौतिक सुविधा मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.


मुळशी येथील एस.एस.वाय. संस्थेने देखील सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर, चप्पल व पाऊच अशी भेट दिली. शाळेसाठी 3 संगणक टेबल व 6 खुर्च्याही दिल्या. हे सर्व साहित्य संस्थेचे प्रमुख श्री. नरेंद्र राणे यांनी शाळेस भेट देऊन मुलांना वाटप केले. अशी माहिती मुख्याध्यापक श्री. हिरामण शेलार यांनी दिली.

वरील संस्थांकडून मदत मिळवून देण्यासाठी मुळशीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज शिंदोडी येथील शिक्षणप्रेमी अशोक वाळुंज यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी वरील मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा खेडकर, उपाध्यक्ष भगवंत वाळुंज, पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष इंद्रभान ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य श्री. एकनाथ वाळुंज, शिवाजी ओव्हाळ, रावसाहेब वाळुंज, प्रकाश शिंदे, रामकृष्ण गायकवाड, शरद ओव्हाळ, मुख्याध्यापक हिरामण शेलार, कैलास गारगोटे, अनिल काळे, अशोक लंघे, विकास वाखारे, राजेंद्र साळुंके, मंगल घोरपडे, शैलजा लंघे, शालन धावडे, वनिता पोपळघट आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या  सौ. सुवर्णा खेडकर यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. शाळेस ISO मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे वाळूंज यांनी सांगितले. यावेळी ISO ऑडीटर श्री. चौधरी उपस्थित होते.सुदाम वाळूंज हे शिंदोडीचे सुपुत्र आहेत. सध्या ते मुळशी येथे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. शिंदोडी हे आडमार्गी असणार गाव असल्याने येथील मुलांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे गावातील विध्यार्थ्यांना कॉम्प्युटर, इंटरनेट यांची माहिती मिळावी म्हणून त्यांनी सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करुन दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या