शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती झाली हायटेक

शिरूर, ता.५ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनिधी) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाजारसमितीने सुरु केलेल्या फेसबुक पेज चे उद्घाटन माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.याच कार्यक्रमात तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली.शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीची घोडदौड सुरु असुन बाजारसमितीने गेल्या वर्षभरात सातत्याने नवनवीन प्रयोग सुरु केले आहे.त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम राबविले आहे.एकेकाळी खितपत पडलेल्या बाजारसमितीने शेतक-यांसाठी जनावर बाजार, तसेच नावीन्यपुर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असल्याने ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाजारसमितीचे फेसबुक पेज चे स्वतंञ  पेज तयार केले.

या फेसबुक पेज चे उद्घाटन माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविबापु काळे, संचालक विजेंद्र गद्रे, आबाराजे मांढरे, अॅड.वसंतराव कोरेकर,विकास आबा शिवले,सतीश कोळपे, सुदिप गुंदेचा, बंडु जाधव, प्रविण चोरडिया, सचिव दिलीप मैड, कोषागार अनिल ढोकले आदी उपस्थित होते.

यावेळी तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली.शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती व क्रुषि विभाग  जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथेल रयत शाळा मैदानावर १५ ते १९फेब्रुवारी दरम्यान  तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या कृषी प्रदर्शनात शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन बदल, त्यातील उत्पन्न वाढीचे झालेले बदल, गाय म्हैस यांच्या नवीन जाती त्याचे मार्गदर्शन व माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे.शेती क्षेत्रात झालेले नवनवीन बदल, नवीन अवजारे मशनरि, कृषी प्रक्रिया उद्योग ठिबक व तुषार शिंचन, आधुनिक किटकनाशके, रासायनिक व सेंद्रिय खते, डेअरी व फूड्स उद्योग,पशुसंवर्धन, पशूखाद्य, नवनवीन बी बियाणे, ट्रॅक्टर व वाहन उद्योग कृषी बॅंकिंग, कृषी  योजना,कृषी  विषयक पुस्तक इलेक्ट्रॉनिक वस्तू, महिला बचत गट स्टॉल, शोभिवंत झाडांची रोपवाटिका, नवीन घरे बंगले, कृषीविषयक चर्चासत्र यांचा या क्रुषि प्रदर्शनात सहभाग व त्यांचे स्टॉल असणार असल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

या कृषी प्रदर्शनात ग्राहक ते शेतकरी या धर्तीवर भव्य धान्य महोत्सव भरवण्यात येणार असून चांगल्या प्रतीचे धान्य पिकवनारे शेतकरी थेट ग्राहक यांच्याशी विक्री करण्याचा माणसं असून यामुळे शेतकरी यांच्या मालाला चांगला भाव तर ग्राहकांना स्वस्त दरात चांगले प्रतीचे धान्य मिळावे हा उद्देश असल्याचे पवार यांनी सांगितले.शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीत जे नवीन बदल केले असतील अशा शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात सहभागि व्हावे तर गावरान गाय, त्यातील जाती अशी जनावरे कुठली असतील त्यांनी या प्रदर्शनात सहभाग घ्यावा त्यासाठी बक्षीस ठेवण्यात आले असल्याचे बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले. हे प्रदर्शन शिरूर एस टी स्टँड मागे रयत शाळा मैदानावर 15 ते  19 फेब्रुवारी रोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत विनामूल्य रहाणार असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या