रांजणगाव देवस्थानमधील सेवकांचे धरणे आंदोलन

पुणे, ता. 5 फेब्रुवारी 2017: श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगाव गणपती देवस्थानमध्ये गेली 15 ते 20 वर्षे कार्यरत असणाऱया सेवकांच्या विविध मागण्या करिता तसेच विश्वस्तांच्या बेकायदेशीर मनमानी कारभाराच्या विरोधात सहधर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या समोर भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखली मंगळवारी (ता. 6) सकाळी 11 पासून धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.सदर देवस्थान मधील कार्मचारी गेल्या अनेक वर्षां पासून काम करीत आहेत. देवस्थानची अर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही त्यांना पुरेसे वेतन व अन्य सेवा सुविधा देण्यात येत नाहीत. सेवकांनी एकत्रित येऊन केवळ संघटना केली म्हणून मुद्दामहून वारांवार बदल्या करणे, चुकीच्या पध्दतीने कामाच्या वेळा लावणे, कर्मचाऱयांचे वेतन कपात करणे, रजा मंजूर न करणे, कामगाराची अडवणूक करून युनियनचे राजीनामे मागणे, अशा प्रकारे त्रास दिला जात आहे.

विश्वस्तांनी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती नुसार, व्यवस्थापक पदावर शैक्षणीक पात्रता नसतानाही त्यांची बेकायदेशीररित्या नेमणूक केली आहे. सदर व्यवस्थापकाला यापुर्वीच्या विश्वस्त मंडळाने गैरकृत्य व महिलेशी असभ्य वर्तणूक या कारणाकरिता कामावरून कमी केले होते. अशाच व्यक्तीची पुन्हा नेमणूक विश्वस्त मंडळांनी केली आहे. जाहिरातीनुसार व्यवस्थापक पद हे पदवीधर उमेदवार असावा. परंतु, सदर व्यवस्थापकाची शैक्षणीक पात्रता नसतानाही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्वीचे रेकॉर्ड चांगले नाही महिलांशी असभ्य व देवस्थानच्या नावलौकीकास न शोभणारे वर्तन अशा बाबी उपरोक्त व्यक्तीच्या आहेत. या विरोधात सहाय्य धर्मादाय आयुक्त पुणे याच्यांकडे जुन 2017 मध्ये तक्रर करूनही अद्यापपर्यत याबाबत कारवाई झाली नसून, सबंधित कार्यालय विश्वस्तांच्या बेकायदेशीर कृत्यास पाठिशी घालत असल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे.

गुप्तदान पेटीतील रक्कम मोजदानाच्या वेळी सर्व विश्वस्त मंडळ पुर्णवेळ हजर असणे बंधनकारक असताना त्या ठिकाणी केवळ पेटी उघडण्यापुरते काही विश्वस्त येतात व ते काही वेळाने निघून जातात. सेवकांवर संपुर्ण जबाबदारी टाकून जातात. दैनिक वर्तमानतपत्रात दिलेल्या कोटेशन प्रमाणे देवस्थानमध्ये कोणतेच काम होत नाही. वरील सर्व गंभीर बाबी अयोग्य असून, त्याचा सर्व कामगार वर्गावर विपरीत परिणाम होत आहे. कामगारवर्ग सतत तणावाखाली वागत आहे. या  बाबत तक्रर करूनही धर्मादाय आयुक्त कार्यालय लक्ष देत नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधी व न्यायमंत्री रणजित पाटील, धर्मादाय आयुक्त मुंबई शिवकुमार डिगे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या कडेही तक्रारीचे निवेदन दिले आहे.

वरील सर्व घटनेची लेखी व तोंडी पत्रव्यवहार करूणही याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे मा. धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या निदर्शनास विश्वस्तांच्या गैरकारभाराबाबत आयुक्ताच्या निदर्शनास आणण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मंगळवार ता. 06/02/2018 रोजी सकाळी 11 वा पासून धर्मादाय आयुक्त पुणे ढोले पाटील रोड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती बाळासाहेब भुजबळ यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

प्रमुख मागण्याः
1) शैक्षणीक पात्रता नसतानाही व देवस्थानमध्ये गैरकृत्य करणाऱया व्यवस्थापकाला त्वरीत कामावरून कमी करण्यात यावे.
2) देवस्थान व समाजाची फसवणूक करणारे विश्वस्त मंडळ त्वरीत बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा.
3) गेली तीन वर्षे विश्वस्तांनी केलेल्या सर्व कामाची चौकशी धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत करण्यात यावी.
4) सेवकांना त्वरीत सन 2016 पासून पगार वाढ लागू करण्यात यावी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या