शिक्रापूरला १०१ सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

शिक्रापूर, ता.६ फेब्रुवारी २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथे सर्वधर्मीय 101 सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयातील नव वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी श्रीश्रीश्री शिवसार्इबाबा उपस्थित होते.


याप्रसंगी ते बोलताना ते म्हणाले कि,आत्मसिध्दी, साधना व शांती या त्रीसुत्रीच्या आधारे कोणत्याही कामात यशस्वी होता येते.सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे साक्षात अमॄत प्रसाद आहे. या सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले की सर्वधर्मीय 101 सामुदायिक विवाह सोहळयात विधीपूर्वक विवाह सोहळा पार पाडला जातो. व या सोहळयाच्या सर्व खर्चाची जबाबदारी सुरेश भुजबळ एकटे पेलत असून त्यांनी शिरूर तालुक्यात नवा इतिहास घडवला आहे असे गोरवोद्गारही याप्रसंगी बोलताना आमदार पाचर्णे यांनी काढले.या सोहळयास आमदार बाबुराव पाचर्णे, सद्गुरू सुमंतबापू हंबीर, नवोदय विद्यालय समितीचे उपाध्यक्ष सुरेशराव भुजबळ, आर्ट अॉफ लिव्हींगचे प्रविणकुमार शर्मा, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, शिरूर बाजार समीतीचे माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाउ सासवडे, समता परीषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ, काँग्रेसचे प्रदेश सदस्य कौस्तुभकुमार गुजर, बाळासाहेब लांडे, उद्योजक व्यंकटेश चलसानी, कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर मिडगुले, प्राचार्य रामदास थिटे, रोहीत खैरे, पुणे प्रादेशिक बाजार समीतीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, उद्योजक संजय भुजबळ, रवि भुजबळ, रमेश भुजबळ, राजेश धुमाळ, संतोष गवारे, कानिफ गव्हाणे, सुभाष लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वव्यापी जनविकास परीषदेचे अध्यक्ष व विवाह सोहळयाचे संयोजक सुरेश भुजबळ यांनी केले.सोमनाथ भुजबळ यांनी सुत्रसंचालन केले तर रामदास थिटे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या