समाजासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद- अशोक पवार

सरदवाडी, ता.६ फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) : अपघातग्रस्तांना तातडीने मदत व्हावी यासाठी विलास कर्डिलेंनी दिलेले योगदान हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोक पवार यांनी केले.


सरदवाडी व शिरुर परिसरात अपघात ग्रस्त व आजारी रुग्णांना तत्काळ मदत मिळावी यासाठी माजी आदर्श सरपंच विलास कर्डिले यांनी वडिल मारुती कर्डिले व रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातुन रुग्णवाहिका उपलब्ध केली असुन या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी आमदार अशोक पवार, उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी पवार हे बोलत होते.पवार पुढे बोलताना म्हणाले कि, कर्डिले व धारिवाल कुटुंबाचे अत्यंत जवळचे नाते होते.अडचणींच्या काळात रसिकभाउंनी अनेकांना भेदभाव न करता मदत केली.त्या मदतीची जाण या कुटुंबाने ठेवुन समाजासाठी बहुमुल्य योगदान दिलेलं कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी केले.

उदयोगपती प्रकाश धारिवाल म्हणाले कि, सरदवाडी हे पुणे नगर रस्त्यावर एकप्रकार गर्दीचे ठिकाण झाले असुन विलास कर्डिलेंनी जे काम केले ते वाखाणण्याजोगे आहे.अडचणींतुन व्यवसाय उभा केला व धारिवाल कुटुंबाने मदत केली असली तरी त्यांनी परतफेड केली.जे काम आम्हांला करायला पाहिजे होते ते या कुटुंबाने केले असल्याने या कुटुंबाच्या आम्ही नेहमीच ऋणात राहु असे प्रकाश धारिवाल बोलताना म्हणाले.

यावेळी बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे, संतदास महाराज मनसुख, रामभाउ सरोदे आदींनी मनोगते  व्यक्त केली.

या कार्यक्रमाला बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे, बंडु जाधव, शिरुर नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी, स्वच्छता  व आरोग्य सभापती सचिन धाडिवाल, नगरसेवक संजय देशमुख, विजय दुगड, रवि ढोबळे, विठ्ठल पवार,अमरिश महाराज देगलुरकर, दशरथ बोरुडे, गुलाबराव बुचडे, संग्राम गुंजाळ, आदी उपस्थित होते.

या वेळी दत्ताञय कुंडलिक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सुञसंचालन संदिप सरोदे यांनी केले तर आभार अजित कर्डिले यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या