रांजणगाव देवस्थानमधील कर्मचाऱयांचे आंदोलन स्थगित

रांजणगाव गणपती, ता. 6 फेब्रुवारी 2017: श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट मधील कर्मचारी यांच्या प्रलबित प्रश्नाकरीता संघटनेची पदाधिकारी व सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्या दरम्यान सोमवारी (ता. 5) चर्चा झाली. चर्चेदरम्यान झालेल्या सकारात्मक भुमिकेमुळे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

कर्मचारी व जगताप यांच्या दरम्यान तब्बल 2/3 तास चर्चा झाली. यावेळी उभयपक्षाच्या चर्चेत व्यवस्थापकाची बेकायदेशीर भरती, दानपेटी मोजण्याबाबत विश्वस्तांची उपस्थिती, कर्मचारी यांचे वेतनवाढ व अन्य प्रलबिंत प्रश्न, जाहिरातीतील कोटेशन प्रमाणे कामे न होणे यासह अनेक विषयांवार चर्चा झाली. वरील सर्व प्रश्नांबाबत विश्वस्तांसह संघटना प्रतिनिधी यांची लवकरच बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय पुढील चर्चा होईपर्यंत संघटनेने नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करावे, असे लेखी पत्र दिल्यामूळे संघटनेने आंदोलन मागे (तात्पुरते) घेतले आहे.

सदर चर्चेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, निरिक्षक श्री. गव्हाणे तर संघटनेच्या वतीने बाळासाहेब भुजबळ, अर्जुन चव्हाण, सचिन मेंगाळे, राम फराटे, रमाकांत शेळके व अन्य कामगार उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या